CM Eknath Shinde sakal
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Decision: " शेतकऱ्यांना मोठी मदत ते विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ" ; मंत्रिमंडळाच्या बैठकितील महत्त्वाचे निर्णय!

Sandip Kapde

Cabinet Decision:   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली.

राज्यात काही ठिकाणी बोगस बियाणे विक्रीच्या घटनांसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांत पथके तयार करून अतिशय काटेकोरपणे छापे टाकण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले.

बियाणे विक्रेते योग्य बियाणे, योग्य दरात विकताहेत की नाही ते तपासून बोगस विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुख्य सचिवांना दिले.

मंत्रिमंडळाच्या बैठकितील महत्त्वाचे निर्णय -

  • सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तात्काळ मदत करणार. १५०० कोटीस मान्यता.

  • कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णय. आता मिळणार १६ हजार रुपये.

  • अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यामध्ये केंद्राप्रमाणे सुधारणा.

  • पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ.

  • लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार.

  • पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार.

  • अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ.

  • मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृहे योजना.

  • स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादेत वाढ.

  • चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT