Rajan Vichare  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Income Tax Raid: ठाकरे गटाला दुसरा मोठा धक्का! रविंद्र वायकर नंतर आता राजन विचारेंच्या घरी आयकर विभागाचा छापा

Income Tax Raid: रविंद्र वायकर नंतर आता खासदार राजन विचारेंच्या घरी आयकर विभागाचा छापा टाकला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल उद्या लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी ४ वाजता निकाल जाहीर करतील. अशातच आमदार अपात्रतेच्या निकालाआधीच ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत. आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. जोगेश्वरी येथील भूखंड गैरवापर प्रकरणी ईडीने वायकर यांच्या ७ ठिकाणांवर ही छापेमारी केल्याची माहिती आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंच्या घरांवर आयकर विभागाने छापा टाकला आहे.

ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंच्या घरावर आयकर विभागाचा छापा टाकल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आमदार रवींद्र वायकरांनंतर आता खासदार राजन विचारे टार्गेटवर असल्याची त्याचबरोबर तपास संस्थांकडून आज ठाकरे गट निशाण्यावर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. अशी माहिती साम टिव्हीने दिली आहे (The Income Tax Department raided the house of Thackeray Group MP Rajan Vichen)

राजन विचारे यांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे. विचारे यांच्याशी संबंधित काही व्यवसायिकांना चौकशीसाठी बोलण्यात आलं आहे, अशी माहिती साम टिव्हीने विश्वसनीय सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे. काही कार्यालयांवर देखील छापेमारी करण्यात आली असल्याची माहिती आहे.

राजन विचारे सध्या ठाण्यातील हिरानंदानी परिसरात राहतात. ठाण्यातील अन्य एका घरावर देखील धाड टाकण्यात आली आहे. विचारेंच्या जुन्या घरामसोर असलेल्या कार्यलयावर देखील आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच आयकर विभागाकडून कारवाईला सुरूवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT