Shiv Sena MLA Disqualification : उद्या जर वेडावाकडा निकाल आला तर... CM शिंदे-नार्वेकर भेटीवरून उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली शंका

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर उद्या म्हणजेच बुधवारी (ता. १०) सायंकाळी चार वाजता निकाल दिला जाणार आहे. या निकालापूर्वी राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.
Uddhav Thackeray questioned Rahul Narvekar meeting CM Eknath Shinde twice Shivsena MLA disqualification result
Uddhav Thackeray questioned Rahul Narvekar meeting CM Eknath Shinde twice Shivsena MLA disqualification result eSakal

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर उद्या म्हणजेच बुधवारी (ता. १०) सायंकाळी चार वाजता निकाल दिला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याप्रकरणाचा निकाल सुनावणार आहेत. या निकालाकडे (mla Disqualification case Result) सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर आक्षेप घेतला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, गेली दीड वर्ष चर्चा, सुनावणी सुरू आहे. गेल्या एप्रील-मे मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताना एका रिझनेबल वेळेत याचा निकाल लावावा अशी सूचना महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष यांना लवाद म्हणून केली. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने यासाठी वेळ मर्यादा दिली नव्हती. यावेळी ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख दिली होती. सुनावणी चालली होती तेव्हाच हा वेळकाढूपणा चालू असल्याचे आम्ही सांगितले होते.

त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी वेळ वाढवून मागण्यात आला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने वेळ १० जानेवारीपर्यंत वाढवून दिली. आता उद्या १० जानेवारी आहे. माझी अपेक्षा आहे की, हे उद्या १० जानेवारीला रात्री ११ वाजून ५९ मिनीटं आणि ५९ सेकंदापर्यंत वेळ खेचतील आणि वेळकाढूपणा करतील असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

Uddhav Thackeray questioned Rahul Narvekar meeting CM Eknath Shinde twice Shivsena MLA disqualification result
Sharad Pawar on MLA disqualification: नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटत असतील तर.. शरद पवारांनी व्यक्त केला संशय

न्यायमूर्तीच अरोपीला जाऊन भेटलेत

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आम्ही सर्वोच्च न्यायालयात नमूद केलं आहे, असं आजपर्यंत झाल्याचं माझ्या ऐकवात नाही. लवाद म्हणून बसलेले विधानसभेचे अध्यक्ष (राहुल नार्वेकर) हे दोन वेळ मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) यांना घरी जाऊन भेटले आहेत. विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात का हा भाग वेगळा झाला, पण सध्या ते ज्या भूमिकेत आहेत त्याचा अर्थ असा होतो की, न्यायमूर्तीच अरोपीला जाऊन भेटलेत. तेही एकदा नाही दोनदा असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. (Judge went and met the accused)

Uddhav Thackeray questioned Rahul Narvekar meeting CM Eknath Shinde twice Shivsena MLA disqualification result
Maharashtra Politics : पुणे-मुंबईचा राज्य सरकार एवढा तिरस्कार करत असेल तर... आदित्य ठाकरे यांनी वाचला रखडलेल्या कामाचा पाढा

आम्ही कोणत्या न्यायाची अपेक्षा ठेवावी?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दोन वेळा आरोपीला भेटले आहेत. आमच्या दृष्टीने ते आरोपीच आहेत. आम्ही त्यांच्यावर अपात्रतेचा खटला दाखल केला आहे आणि याच्याबद्दल आम्हाल न्यायाची अपेक्षा आहे. आता हे न्यायमूर्ती जर आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडून उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि न्यायाची अपेक्षा ठेवावी हा एक प्रश्नच आहे असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. (What justice to expect?)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com