Jawan Narendra Singh esakal
महाराष्ट्र बातम्या

काळाचा घाला! वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी जवानाचा Heart Attack नं मृत्यू

कुटुंबीय जवानाच्या लग्नाची तयारी करत होते. मात्र, लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ डिजिटल टीम

कुटुंबीय जवानाच्या लग्नाची तयारी करत होते. मात्र, लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

मुंबई : महेंद्रगड जिल्ह्यातील (Mahendragarh Haryana) बेरी गावामधील जवान नरेंद्र सिंह (Jawan Narendra Singh) यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. नरेंद्र कुमार हे फक्त 27 वर्षांचे होते आणि निधनाच्या एक दिवसापूर्वीच त्यांचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा केल्यानंतर त्याच रात्री नरेंद्र यांना हृदयविकाराचा झटका आला.

नरेंद्र सिंह हे भारतीय नौदलात (Indian Navy) हवालदार पदावर कार्यरत होते. सध्या त्यांची ड्युटी मुंबईत होती. तिथंच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. नरेंद्र सिंह यांच्या निधनाचं वृत्त समजताच त्यांच्या गावात शोककळा पसरलीय.

कुटुंबीयांकडून लग्नाची तयारी

सोमवारी दुपारी नरेंद्र कुमार यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी बेरी इथं पोहोचलं, तेव्हा उपस्थित नागरिकांनी 'नरेंद्र भाई अमर रहे'च्या घोषणा दिल्या. यानंतर त्यांना त्यांच्या मूळ गावी बेरीत अखेरचा निरोप देण्यात आला. नरेंद्र सिंह यांचं लग्न याच वर्षी डिसेंबर महिन्यात निश्चित झालं होतं. कुटुंबीय त्यांच्या लग्नाची तयारी करत होते. मात्र, लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांपूर्वी नरेंद्र सिंह यांचा मृत्यू झाला आहे. नरेंद्र सिंह यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान पहाटे चार वाजता त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: 'पोलिसांकडे जा, व्यवस्थेवर विश्वास ठेवा', पैगंबरविरोधी वक्तव्य प्रकरणातील याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट संदेश

Kolhapur Inspirational Success Story: यळगुडच्या सरिताची राज्यात झेप! आयुष भरतीत महिला प्रवर्गात चौथा क्रमांक; राजपत्रित अधिकारीपदी निवड

आजचे पंचांग ९ जुलै २०२६! गुरुवारचे शुभ मुहूर्त, राहुकाल आणि राशीनुसार चंद्रबळ

Beed Farmer Successful Story : 50 हजारांची नोकरी सोडली अन् 63 व्या वर्षी बीडच्या माळरानावर पिकवलं 'काळं सोनं'; उच्चशिक्षित शेतकऱ्याची दुष्काळावर मात, कसं फिरवलं नशीब?

हृदय, किडनी आणि मधुमेह यांचा एकमेकांशी काय आहे संबंध ? जाणून घ्या 'CKM सिंड्रोम' म्हणजे काय ?

SCROLL FOR NEXT