पराभवाची कारणं वेगळी, आता पुन्हा शशिकांत शिंदेंना आमदार करू; NCP च्या बड्या नेत्याची ग्वाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Koregaon NCP Shashikant Shinde

'संपूर्ण तालुका एकवटला पाहिजे. मी स्वत: तुमच्यासोबत आहे.'

पराभवाची कारणं वेगळी, आता पुन्हा शशिकांत शिंदेंना आमदार करू; NCP च्या बड्या नेत्याची ग्वाही

पळशी (सातारा) : शशिकांत शिंदे यांना पुन्हा आमदार करायचं आहे. त्यावेळची समीकरणं व त्यांच्या पराभवाची कारणं वेगळी आहेत; पण आता कोरेगावची अस्मिता म्हणून कॉरिडॉर, एमआयडीसी या मुद्‍द्यावर लक्ष केंद्रित करून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना पुन्हा आमदार करू, अशी ग्वाही विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी दिली.

कोरेगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Koregaon NCP) मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. औद्योगिक कॉरिडॉरसाठी कोरेगाव तालुक्यात जागा देण्याचे सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे. त्याप्रमाणे कोरेगावला कॉरिडॉर द्या किंवा राज्याची एमआयडीसी तरी द्या, अशी मागणी रामराजेंनी मेळाव्यात केली.

हेही वाचा: TRS : मोदींना टक्कर देण्यासाठी KCR यांची लवकरच राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री

रामराजे म्हणाले, ‘‘आंदोलन करायचंच, तर औद्योगिक वसाहतीसाठी करा. कोरेगावच्या उत्तर भागात हा प्रकल्प झाला, तर त्याचा फायदा संपूर्ण कोरेगाव तालुक्याला म्हणजेच बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील कार्यक्षेत्रालाही होणार आहे. तुमच्याकडे अस्मिता आहे, की नाही. सोळशी व परिसरापासून राष्ट्रीय महामार्ग जवळ आहे. भौगोलिकदृष्ट्या हा भाग चांगला आहे. याप्रश्नी कोरेगावच्या उत्तर भागातील २६ गावांनीच ओरड करायची, हे कुठपर्यंत चालणार? त्यासाठी संपूर्ण तालुका एकवटला पाहिजे. मी स्वत: तुमच्यासोबत आहे. त्यासाठी जमीन कशी घ्यायची, संबंधितांना चांगला दर कसा द्यायचा, उत्तम कारखाने कसे आणायचे, हे मी व शशिकांत शिंदे आम्ही दोघे बघू.’’

हेही वाचा: Gujarat : धार्मिक झेंड्यावरून हिंदू-मुस्लिम गटांत तुफान हाणामारी; 40 जणांना अटक

निंबाळकर म्हणाले, ‘‘कॉरिडॉरसाठी मागच्या सरकारने म्हसवडची जागा निश्चित केली आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रभाकर देशमुख यांच्यामुळे हे शक्य झाले आहे. त्यासाठी माझ्यासकट कोणी नाही म्हटले नाही. अजित पवार मला म्हणाले कॉरिडॉर म्हसवडला होऊ द्या. मग मी म्हणालो, आम्हाला राज्याची एमआयडीसी तरी द्या. माझे काय चुकले?’’ सरकार बदलल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. ते सातारा जिल्ह्यातीलच आहेत. त्यांनीच औद्योगिक कॉरिडॉरसाठी कोरेगाव तालुक्यात जागा देण्याचे मान्य केले आहे. त्याप्रमाणे कोरेगावला कॉरिडॉर द्या किंवा म्हसवडला कॉरिडॉर खुशाल घ्या, राज्याची एमआयडीसी तरी कोरेगावला द्या, अशी मागणीही निंबाळकर यांनी केली. यावेळी त्यांनी शशिकांत शिंदेंना पुन्हा आमदार करण्याची ग्वाहीही दिली.

हेही वाचा: पोलीस महासंचालकाची गळा चिरून हत्या; दहशतवादी कनेक्शन आलं समोर, PAFF नं स्वीकारली जबाबदारी