Shivsena News Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena News: शिवसेनेत दोन गट पाडणं, हे भाजपचंच मिशन; भाजपच्या या बड्या नेत्याची कबुली

शिंदे यांनी आणि 40 समर्थकांनी बंड केलं आणि राज्याचं राजकारण पालटून गेलं

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांनी आणि 40 समर्थकांनी बंड केलं आणि राज्याचं राजकारण पालटून गेलं. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदार यांनी बंड केल्यावर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि राज्यात नवीन सरकार स्थापन झालं. शिंदे गटाने भाजप सोबत युतीचं सरकार स्थापन केलं.

दरम्यान या सत्तसंघर्षाला पूर्णपणे भाजप जबाबदार असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार केला जातो. अशात या सत्तसंघर्षाची संपूर्ण जबाबदारी किंवा कबुलीच भाजपच्या एका मोठ्या नेत्याने दिली आहे. भाजप नेत्याच्या या कबुलीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

हे ही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

शिवसेनेमध्ये दोन गट पडण्यामागे भाजपचंच मिशन होतं अशी कबुली मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. महाजन यांच्या या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गुलाबराव पाटीलही उपस्थित होते. जळगावमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिवसेनेत फूट पाडण्याचा भाजपचाच डाव असल्याचं कबुल केलं आहे.

कार्यक्रमात बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, "एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले. या गोष्टीचा विचार केला तर आम्हालाही विश्वास बसत नव्हता. मात्र ऑपरेशन सुरू केलं. एकनाथजी पुढे निघाले. ते पुढे गेले आणि बघता बघता त्यांचं सर्व सैन्य त्यांच्या मागे गेलं आणि शेवटी सार जमलंच. सारं जुळून आलं. घडून आलं, हे सांगत यामागे चामुंडा मातेचाही आशीर्वाद होताच." असं ते म्हणाले आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले की, "हे मिशन वाटत तितकं सोपं नव्हतं. शिवसेनेसारख्या पक्षातून 40 लोक बाहेर पडतात, उद्धव ठाकरे यांना कंटाळून ते बाहेर पडतात. सतरा अठरा लोक घेऊन बाहेर पडायचं आणि पन्नासपर्यंत मजल गाठायची, हे खूप अवघड होतं. मध्येच मिशन फेल झालं तर काय करायचं? असं वाटायचं. मात्र पुढारी कसे असतात, तुम्हाला माहिती आहे", असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Shroff shooting incident : टायगरला फोन करून समजावलं होतं, पण...; बिश्नोई गँगनं घेतली हल्ल्याची जबाबदारी

CEC Gyanesh Kumar Row : देशातील संघर्ष आता आंतरराष्ट्रीय स्तरावर! लंडनमधून ध्रुव राठीचा थेट हल्लाबोल, म्हणाला...

Marathwada Graduate Election 2026: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट! ४० हून अधिक आजी-माजी आमदार, खासदार मतदानापासून वंचित?

Solapur Politics : ऐन मतदानाच्या तोंडावर शरद पवारांना सर्वात मोठा धक्का; सोलापुरातील ३ आमदारांचा थेट भाजपला पाठिंबा, नेमकं काय घडलं?

Video: टायगर श्रॉफवर गोळीबार; दुचाकीवरून आले तीन हल्लेखोर,धक्कादायक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT