
Sanjay Raut : "संजय राऊत भांग पिऊन आमच्यासोबत फोटो काढला का?"
नाशिकमध्ये शिंदे गटात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. त्यानंतर संजय राऊत यांनी या प्रवेशावर टीका करत आम्ही या कार्यकर्त्यांना ओळखत नाही, ते पालापाचोळा आहेत असंही संजय राऊत म्हणाले होते.
संजय राऊत यांच्या या टीकेला उत्तर देत या पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मी त्यांना ओळखत नाही असं राहुट म्हणाले त्यावर राऊत यांच्यासोबतचे फोटो दाखवत या पदाधिकाऱ्यांनी राऊत भांग खाऊन आमच्यासोबत फोटो काढले आहेत का? असं ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी राऊत यांच्यासोबतचे फोटोही पत्रकार परिषदेत दाखवले आहेत.
हे ही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....
सिल्व्हर ओकवर जाऊन तुम्ही भंग खाऊन येता का? आम्हाला ओळखत नाही तर खांद्यावर हात टाकून फोटो का काढता? असा सवाल करत ते फक्त शिवसैनिकांचा कामापुरता उपयोग केला जात आहे. यांना दगड फेकण्यापूरत वापरता आणि त्यांनाच पालापाचोळा म्हणता असं पदाधिकाऱ्यांनी यावेळी म्हंटलं आहे.
हेही वाचा: Vasant More : स्थान नाही? राज ठाकरे यांच्या कार्यक्रमात वसंत मोरे तासभर उभेच
संजय राऊत कधी रस्त्यावर उतरले. ही शिवसेना फक्त शिवसैनिकांमुळे इथं आहे. राऊत फक्त शरद पवार यांच्याकडे जातात आणि शिवसेना कशी संपवायची हे शिकून येऊन 10 वाजता बोलतात. आम्ही शिवसेना काय आहे ते दाखवू हिम्मत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तिथ येतो आमच्या मागे आता शिंदे साहेब आहेत. तुम्ही सांगा तुम्हाला तुडवातुडवी काय असते ते दाखवतो असं पदाधिकारी यावेळी बोलताना म्हणाले आहेत.
हेही वाचा: Sharad Pawar : पवार घराण्यात राजकारण! साहेबांचे दोन नातू निवडणुकीच्या रिंगणात तरीपण...