Rahul Gandhi and Sharad Pawar  
महाराष्ट्र बातम्या

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत शरद पवार सहभागी होणार? काँग्रेस प्रवक्ते रमेश म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष शरद पवार भारत जोडो यात्रेत सामील होणार की नाही याबाबत मोठी अपडेट आली आहे. ८१ वर्षीय पवार यांनी यापूर्वी भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची इच्छा व्य्क्त केली होती. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव ते यात्रेत सहभागी होऊ शकणार नसल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलताना होते.

पवार यांना नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानतंर त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिली होता. त्यामुळे ते यात्रेत सामील होणार नाहीत. मात्र शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजीमंत्री जितेंद्र आव्हाड भारत जोडो यात्रेत दाखल झाले आहेत. तसेच सायंकाळच्या मेळाव्यातही हे नेते उपस्थित राहणार असल्याचं रमेश यांनी सांगितलं.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हेही या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. रमेश म्हणाले की, शरद पवार रुग्णालयात दाखल असतानाच राहुल गांधी यांनी त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी पवारांनी यात्रेत सहभागी होण्यासाठी सहमती दर्शवली होती. मात्र डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ल्या दिल्याने ते यात्रेत सहभागी होणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Balen Shah: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह शंभर दिवसांमध्येच आले अडचणीत; सरकारविरोधात संघर्ष पेटला

IND vs ZIM 1st T20I: मयांक यादवने इतिहास रचला, पण कौतुक इशान किशनचे झाले! पहिल्याच चेंडूवर असे काय घडले? Video Viral

Ajit Pawar Statue: बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्यातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे भावपूर्ण लोकार्पण; तिरंगा सर्कलजवळ स्मृतीस्थळाला मान्यवरांची उपस्थिती

Latest Marathi Update : मुसळधार पावसामुळे मक्कासार गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण

Delhi Lathi Charge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा मोहोळमध्ये तीव्र निषेध; विविध पक्ष, संघटना व वकील संघटनेची भव्य रॅली

SCROLL FOR NEXT