Nitesh Rane Santosh Parab Case Goa connection sakal
महाराष्ट्र बातम्या

गोवा कनेक्शन? कणकवली पोलिस नितेश राणेंना घेऊन रवाना?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : संतोष परब हल्लाप्रकरणी (Santosh Parab Attack) भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांना पोलिस कोठडी देण्यात आली. त्यानंतर आज कणकवली पोलिसांनी (Kankavli Police) सकाळी दहा वाजतापासून तर सव्वातीन वाजेपर्यंत नितेश यांची चौकशी केली. आता पोलिस त्यांना गोव्याला (Goa) घेऊन गेल्याची माहिती आहे.

संतोष परब हल्लाप्रकरण मुख्य आरोपीला दिल्लीवरून अटक केल्यानंतर भाजपच्या नितेश राणेंच्या अटकेची मागणी झाली. त्यानंतर कणकवली पोलिसांनी नितेश राणेंना समन्स बजावला होता. तसेच त्यांच्या अटकेसाठी गोवा, मुंबई आणि सिंधुदुर्गात फिल्डींग लावली होती. पण, नितेश राणे कुठे होते? हे कोणालाच माहिती नव्हते. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नितेश राणे पुढे आले नव्हते. ते गोव्यात लपून बसल्याची माहिती होती. तपासादरम्यान नितेश राणेंचं लोकेशन काय होतं? ते तिथे काय करत होते? याची चौकशी करण्यासाठी कणकवली पोलिस नितेश राणेंना घेऊन गोव्यात गेल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? -

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर थेटपणे संशयाची सुई आली होती. पोलीस तपासातही त्यात पुरावे सापडल्याने नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. याप्रकरणी न्यायालयानं त्यांना दोन दिवसांची म्हणजेच ४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तत्पूर्वी नितेश राणे बुधवारी सकाळी कणकवली जिल्हा न्यायालयात शरण आले होते. त्यानंतर कोर्टानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT