CM Uddhav Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

निवडणुकीपूर्वीच CM ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक; दिला 'हा' कानमंत्र

शिवसेनेकडून आपल्या आमदारांना रेनीसन्स हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : विधानपरिषदेची निवडणुक जवळ आली असून त्यासाठी सर्व पक्षांकडून घोडेबाजी रोखण्यासाठी काळजी घेतली आहे. दरम्यान शिवेसेनेच्या आमदारांची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. शिवसेनेकडून आपल्या आमदारांना पवईतल्या रेनीसन्स हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.

(Shivsena Meeting Before Election)

दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणावरून आपल्या आमदारांना कानमंत्र दिला आहे. दरम्यान शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष उमेदवारांना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन गेल्याचं बोललं जातंय. तर शिवसेनेच्या नेत्यांकडून महाविकास आघाडी एकत्र होऊन लढणार असल्याचं सांगितलं आहे.

राज्यसभेच्या निवडणुकांत जी चूक झाली ती चूक पुन्हा होवू नये यासाठी हा कानमंत्र मुख्यमंत्र्यांनी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी आमदारांना दिला आहे. राज्यसभेची पुनरावृत्ती पुन्हा होवू नये यासाठी योग्य ते मार्गदर्शन आणि याविषयीच्या सर्वसाधारण सूचना आमदारांना देण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीतल्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी मी संजय राऊत यांच्यासमोरच मतदान करणार आहे असं सांगितलं आहे. कारण पराभव झाल्यावर संजय राऊत त्यांच्या पराभवाचे खापर आमच्यावर म्हणजे अपक्षांवर फोडणार आहेत असं ते म्हणाले आहेत.

"संजय राऊत यांना माझ्यासोबत मतदान करताना पाठवा अशी मागणी मी महाविकास आघाडीच्या बैठकीत करणार आहे. मी त्यांच्यासोबत मतदान करणार आहे. नाहीतर माझा मत करण्याचा अधिकार संजय राऊत यांना देवून टाका म्हणजे शंका घेण्याचा प्रश्नच राहणार नाही." असं अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितलं आहे.

तर संजय राऊत म्हणाले की. "आमचा अपक्ष आमदारांवर पूर्ण विश्वास आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते सर्वांचेच आहेत आणि भुयारांवरही आमचा विश्वास आहे." असं राऊत म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India T20 Captain: सूर्यकुमारला T20 कॅप्टन्सीवरून काढणार, मग भारताच्या नेतृत्वासाठी पर्याय कोण? हे तिघे शर्यतीत आघाडीवर

Shaktipeeth Highway survey : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीपूर्वी पहाटे शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; माळशिरस तालुक्यात शेतकरी संतप्त

Petrol-Diesel Rate: 4 जूनला पेट्रोल-डिझेल आणि CNGचे नवे दर जाहीर! मुंबई, पुणेसह तुमच्या शहरातील ताजे भाव पाहा

Paithan Murder Case: अल्पवयीन मुलाच्या खूनप्रकरणी शिवसेना नगरसेवकाविरुद्ध गुन्हा, पैठणमध्ये १७ वर्षीय मुलाची हत्या

Donald Trump Iran War Powers : ट्रम्प यांना मोठा झटका! इराणविरोधातील संघर्ष थांबवण्यासाठी संसदेत प्रस्ताव, स्वतःच्या पक्षानेही दिला धक्का

SCROLL FOR NEXT