PMJJBY
PMJJBY google
महाराष्ट्र

दरवर्षी फक्त ३३० रुपये भरा; तुमच्या मृत्यूनंतर वारसाला मिळतील २ लाख रुपये

नमिता धुरी

मुंबई : सामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असते. यापैकीच एक आहे Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana. यात तुम्ही दरवर्षी ३३० रुपये भरून उतारवयात मोठी रक्कम मिळवू शकता. तसेच २ लाख रुपयांचा विमाही मिळू शकतो.

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana

केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात २०१५ साली केली होती. या योजनेअंतर्गत संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला २ लाख रुपये दिले जातात. १८ ते ५० वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक असलेली व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकते. वय ५५ वर्षे झाल्यानंतर ही योजना बंद होते. योजनेची सुरुवात १ जूनला होते आणि पुढील वर्षी ३१ मेपर्यंत ही योजना चालते.

विमाधारकांना आपला वार्षिक हप्ता स्वत: भरण्याची गरज नाही. नियोजित तारखेला विमाधारकाच्या खात्यातून आपोआप रक्कम वजा होते. या योजनेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय तपासणीची गरज नाही.

अर्ज कसा कराल ?

या योजनेत सहभागी होण्यासाठी तुमचे कोणत्याही बँकेत खाते असणे आवश्यक आहे. या योजनेचा कालावधी ५५ वर्षे आहे. आधारकार्ड, ओळखपत्र, पासबुक, भ्रमणध्वनी क्रमांक, पासपोर्ट साइज फोटो या गोष्टी आवश्यक आहे. यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT