Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: २०१९ मध्ये लढलेल्या सर्व जागांसाठी शिंदे गट आग्रही! तर अजितदादांचं काय?,  नेमका फॉर्म्युला कसा ठरणार? 

शिंदे गट महाराष्ट्रात लोकसभेच्या २३ जागा लढण्यासाठी आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी हा दावा केला आहे.

Sandip Kapde

Eknath Shinde: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आगामी लोकसभा निवडणुकीत २३ जागा लढण्यासाठी आग्रही आहे. मात्र सत्ताधारी आघाडीतील भागीदार भाजप शिंदे यांच्या योजनेशी सहमत नाही. ४८ जागांमध्ये आता अजित पवार गटाला देखील जागा द्याव्या लागीतल. त्यामुळे याबाबत खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच स्पष्टीकरण द्यावे लागले. यापूर्वी भाजपने स्पष्ट केले की जागावाटपाचा फॉर्म्युला परस्पर संमतीने ठरवला जाईल.

दरम्यान, शिंदे गट महाराष्ट्रात लोकसभेच्या २३ जागा लढण्यासाठी आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी हा दावा केला आहे. २०१९ मध्ये लढलेल्या सर्व जागांसाठी आग्रही असल्याचे जाधव म्हणाले. महायुतीत मेरिटवर जागावाटप होईल अशी माहिती देखील प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.

४५ पेक्षा जास्त खासदार आपल्याला महाराष्ट्रातून निवडून पाठवायचे आहेत. महायुतीत मेरिटनुसार जागावाटप होईल. बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद आमच्यासोबत आहे. गेल्या निवडणुकीत धनुष्यबाण घेऊन जेवढ्या मतदार संघात आमचे उमेदवार लढले ते मतदार संघ आणि जागा आम्हाल पाहीजेत. हा आमचा आग्रह असल्याचे प्रतापराव जाधव म्हणाले.

एकनाथ शिंदे महाराष्ट्रात मुख्यमंत्री असले तरी भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. अजित पवार देखील एनडीएमध्ये प्रमुख नेते आहेत. भाजपचे महाराष्ट्रात ४८ पैकी २३ खासदार आहेत तर २०१९ च्या निवडणुकीत भाजपने २५ जागा लढवल्या होत्या. अशा स्थितीत भाजप २०२४ मध्ये किमान २५ जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित २३ जागा अजित पवार व एकनाथ शिंदेंना मिळण्याती शक्यता आहे. जर भाजपने १ जागा कमी केली म्हणजे भाजपने २४ जागा लढल्याल तर बाकी २४ मध्ये अजितदादा आणि शिंदे गटात १२+१२ असा फॉर्म्युला ठरू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT