Strike: 1 जानेवारीपासून राज्यभरातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर; सामान्यांचे हाल होण्याची शक्यता

strike: राज्यातील रेशन दुकानदार नव्या वर्षांच्या पहिल्या दिवसापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. यामुळे सामान्यांचे हाल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Strike
StrikeEsakal

राज्यभरातील रेशन दुकानदार उद्यापासून म्हणजेच १ जानेवारीपासून बेमुदत संपावर (strike ) जाणार आहेत. विविध मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे. या बंदमध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ देखील संपावर असणार आहे. दरम्यान येत्या 1 जानेवारीपासून पुण्यासह राज्यभरातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर असणार आहेत. (Latest Marathi News)

रेशन दुकानदारांच्या विविध मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर, प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने उद्यापासून बेमुदत संप पुकारणार असल्याचे जाहीर केले आहे.

Strike
वाळूज MIDCमध्ये अग्नीतांडव! जेवण करून झोपलो अन्... बाहेर सर्वत्र धूर; दुर्घटनेतून बचावलेल्या कामगाराने सांगितली आपबिती

रेशन दुकानदारांच्या मागण्या काय?

रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी ५० हजार करा, टू जी ऐवजी फोरजी मशीन द्या, मार्जिन मनी ३०० रुपये करा, कालबाह्य नियम बदला, आनंदाचा शिधा कायमस्वरुपी करा. तसेच चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा, यासारख्या मागण्यांसाठी रेशन दुकानदार उद्यापासून संप पुकारणार आहेत. (Marathi Tajya Batmya)

नव वर्षांच्या पहिल्याच दिवसापासून रेशनचं दुकान बंद असणार आहे. त्यामुळे सामान्य आणि गरजू नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे.

Strike
Maharashtra Politics : ठाकरे गटाचा लोकसभेच्या २३ जागांवर दावा, तर काँग्रेसकडून २२ वर तयारी सुरू; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com