Loksabha Election 2024 
महाराष्ट्र बातम्या

Loksabha Election 2024: शिवसेनेच्या लोकसभेच्या त्या १३ जागांवर कुणाचा डोळा? मविआत राडा होण्याची शक्यता

Sandip Kapde

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली. लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानल्या जात आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रसमध्ये झालेल्या चर्चेची माहीती देण्यात आली. जागा वाटपाबाबत चर्चा झाली नाही. फक्त विचारांवर चर्चा झाली. सखोल चर्चा झाली नाही. अधिवेशनाच्या पूर्वतयारी बाबत चर्चा झाली. ही औपचारीक भेट होती.

शिवसेनेने ज्या जागा जिंकल्या होत्या त्या त्यांनाच मिळाव्या, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर अशोक चव्हाण म्हणाले, अस नाही आहे. चर्चा झाल्यानंतर हा विषय मार्गी लागू शकतो. राज्यातील राजकीय बदलली आहे. तिघांनाही समजून घ्याव लागेल.

राज्यातील राजीकीय परिस्थिती आणि मेरीट डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेण्यात येईल. ज्या ठिकाणी जागा निवडून आलेल्या होत्या. जे खासदार आहेत तिथे अडचणी येणार नाहीत. मात्र जे खासदार इतर पक्षात गेले. तेथील सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे, हा प्राथमिक विषय आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात यावा, असे चव्हाण म्हणाले.

ठाकरे गटाचे खासदार एकूण १८ खासदार होते. त्यांच्यापैकी १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले. त्यामुळे महाविकास आघाडीत या जागांसाठी गदारोळ होऊ शकतो. अशोक चव्हाण यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळाच चर्चेला उधान आलं आहे.

त्या १३ जागा कोणत्या?

दक्षिण मध्य (मुंबई), उत्तर मध्य  (मुंबई), यवतमाळ, कल्याण, हातकांगले, कोल्हापूर, बुलढाणा, नाशिक, मावळ, हिंगोली, रामटेक, परभणी, शिर्डी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT