Uddhav Thackeray vs Uma Bharti esakal
महाराष्ट्र बातम्या

'सध्याची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाहीय, हे सरकार पडायलाच हवं'

सकाळ डिजिटल टीम

'महाविकास आघाडीमधील शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना नाहीये, ती काँग्रेसची बी टीम आहे.'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार हे त्यांच्याच पक्षातील शिवसैनिक आणि मंत्री (Shivsena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अडचणीत आणलंय. काल जनतेला संबोधन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मी आजच वर्षा बंगला सोडत असल्याची घोषणा केली होती. ही घोषणा काही तासातच खरी ठरली. त्यांनी सर्व साहित्यासह वर्षा बंगला (Varsha Bunglow) सोडलाय. ते त्यांच्या मातोश्री या निवासस्थानीच आता मुक्कामी असणार आहेत.

तर, मला कुठल्याही आमदारानं मी मुख्यमंत्री म्हणून कारभार करण्यास सक्षम नसल्याचं सांगावं, मी एका मिनिटात राजीनामा देईन, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणले होते. तसेच मुख्यमंत्री बोलून गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या चार मागण्या थेट ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या होत्या. यातून तर मुख्यमंत्री आणि शिंदे यांच्यात कुठेही मेळ होताना दिसत नाही, त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदही सोडणार का? असाही सवाल आता विचारण्यात येत आहे.

दरम्यान, कोणत्याही क्षणी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळू शकतं, अशी स्थिती आहे. असं असताना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या (BJP) ज्येष्ठ नेत्या उमा भारती (Uma Bharti) यांनी मोठं विधान केलंय. सध्याची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नाही, हे सरकार पडायलाच हवं, असं त्यांनी म्हटलंय. उमा भारतींनी यावेळी शिवसेनेवर जोरदार टीका केलीय.

टीका करताना त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे सडकं फळ आहे, ते पडायलाच हवं. महाराष्ट्रात स्थापन झालेलं महाविकास आघाडी सरकार चुकीच्या पद्धतीनं स्थापन झालंय. कारण, काँग्रेस आणि शिवसेना कधीच एकत्र होऊ शकत नाही. त्यामुळं ते सरकार हे सडकं फळ आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणं, हाच त्यांचा एकमेव हेतू होता, असंही त्या म्हणाल्या. महाविकास आघाडीमधील शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना नाहीये, ती काँग्रेसची बी टीम असलेली शिवसेना आहे. त्यामुळं हे सरकार पडायलाच हवं, कारण ते हिंदुविरोधी आणि महिलाविरोधी सरकार आहे, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT