महाराष्ट्र बातम्या

सत्ताधारी विरोधकांमध्ये धक्काबुक्की; ओबीसी आरक्षणावरुन गोंधळ

नामदेव कुंभार

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. सत्ताधारी आणि विरोधक पहिल्याच दिवशी आमने-सामने आले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पहिल्याच दिवशी विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक भिडले आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात विरोधकांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाने केला. विरोधकांनी मात्र, या आरोपाचं खंडण केलं आहे. अभूतपुर्व गोंधळामुळे अधिवेशनाचं कामकाज तीन वेळा दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं आहे.

ओबीसींचा इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारने देण्यासाठी विधानसभेत ठराव मांडण्यात आला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हा ठराव मांडला. बराच प्रयत्न करूनही ओबीसींचा डेटा मिळाला नाही. त्यामुळे हा ठराव मांडत असल्याचं भुजबळ यांनी यावेळी सांगितलं. यावेळी विरोधकांचा जोरदार गदारोळ सुरु होता. कामकाज तहकूब झाल्यानंतर कुटे यांनी अध्यक्षांच्या केबिनमध्ये भास्कर जाधव यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी केला. कुटे यांनी तो आरोप फेटाळला आणि गर्दीमुळे धक्का लागल्याचा दावा केला. आम्हाला सभागृहात बोलू न दिल्याने आपण आक्रमक झाल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, मलिक यांनी अशा आमदारांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

भाजप ओबीसींची दिशाभूल करत असून ओबीसी मुद्द्यावर विरोधकांनी तालिका अध्यक्षांच्या दालनात जाऊन धक्काबुक्की केली. ओबीसी मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा तोल सुटला असून भाजपला ओबीसींचा रोष असल्याचं स्पष्ट झालं आहे, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. तर धक्काबुक्की करणाऱ्या भाजप आमदारांवर कारवाई करण्याची मागणी सुनील प्रभू यांनी केली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत विधानसभेत जोरदार घोषणाबाजी झाली. या मुद्यावर बोलू न दिल्याच्या निषेधार्थ विरोधी भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घातला. आमदार गिरीश महाजन , संजय कुटे यांनी विधानसभा अध्यक्षांसमोर येऊन घोषणा दिल्या. आमदार कुटे यांनी अध्यक्षांसमोरचा माईक खेचण्याचा प्रयत्न केला. या गोंधळामुळे वारंवार कामकाज तहकूब करण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT