esakal | Covishield लस घेतली असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच...
sakal

बोलून बातमी शोधा

covishield

Covishield लस घेतली असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच...

sakal_logo
By
नामदेव कुंभार

भारतामध्ये कोरोना महामारीची दुसरी लाट हळू हळ ओसरत असल्याचं दिसत आहे. मात्र, डेल्टा व्हेरियंटचं (B1.617.2) संकट मात्र कायम आहे. यासाठी सरकारकडून सर्वोत्परीने प्रयत्न केले जात आहे. कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. भारतात सध्या कोव्हॅक्सिन, स्पुटनिक व्ही आणि कोव्हिशील्ड या लसी दिल्या जात आहे. अशातच कोव्हिशील्ड लसीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका अभ्यासात असं समोर आलेय की, कोव्हिशील्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये 16.1 टक्के लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंटच्या (B1.617.2) अँटिबॉडी आढळल्या नाहीत. तर फक्त एक डोस घेतलेल्या तब्बल 58 टक्के लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंटच्या (B1.617.2) अँटिबॉडी आढळल्या नाहीत. लस घेतल्यानंतरही ज्या लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंटच्या (B1.617.2) अँटिबॉडीज तयार झाल्या नाहीत, अशा लोकांना लसीचा अतिरिक्त बूस्टर घ्यावा लागेल, असे संकेत अभ्यासातून मिळत आहेत.

देशात कोरोना महामारीची दुसरी लाट हळूहळू ओसरत असली तरीही तिसऱ्या लाटेचा धोका मात्र कायम आहे. त्यामुळेच देशात लसीकरणावर जोर देण्यात आला आहे. भारतामध्ये 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्यात येत आहे. तर 12 ते 18 देशात सध्या कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही लस देण्यात येत आहे. कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन या स्वदेशी लसी आहेत.

हेही वाचा: युती पुन्हा होणार? फडणवीसांचं शिवसेनेबाबत सूचक वक्तव्य, म्हणाले…!

वेल्लोरस्थित ख्रिश्चियन वैद्यकीय महाविद्यालयाच्या मायक्रोबॉयोलॉजी विभागाचे माजी प्रमुख डॉ. जेकब जॉन यांनी हिंदुस्थान टाईम्सला सांगितलं की, “कोव्हिशील्डची लस घेतलल्यांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्या असतील. मात्र त्याचं प्रमाण तुलनेनं कमी असेल. त्यामुळे त्या डिटेक्ट झाल्या नसतील. कोरोनापासून बचाव होईल इतक्या अँटिबॉडीज त्यांच्या शरीरात असतील. अँटिबॉडी आढळून न येणं आणि अँटिबॉडी तयार होणं या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहेत.”

loading image
go to top