maharashtra assembly winter session 2022 policemen on duty had to starve as their food ran out in nagpur  
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Winter Session : राजकीय नेते तुपाशी, बंदोबस्ताचे पोलिस मात्र उपाशी! जेवण संपल्यानं गोंधळ

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : आजपासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवशेन सुरू झाले. या पार्श्वभूमिवर नागपूर येथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान या अधिवेशनात सुरक्षा बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना जेवण मिळालं नसल्याने हाल होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

नागपूर येते होत असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसाठी असलेलं जेवण संपल्याने अनेक पोलिसांची उपासमार झाली. सकाळपासून हे पोलिस वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्तावर आहेत. दुपारपर्यंत उभं राहूण कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना वेळेवर जेवण मिळालं नाही.

हेही वाचा - ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

हिवाळी अधिवेशनानिमीत्त राज्यभरातून पोलिस नागपूरात दाखल झाले आहेत. विधानभवन परिसरात तसेच मोर्चा असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसेच या पोलिसांच्या जेवणाची व्यवस्था खासगी कंत्राटदारामार्फत त्या-त्या जागी करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पोलिस तैनात आहेत त्या ठिकाणी बुफे पध्दतीने जेवण देण्यात येत होते. मात्र वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेलं जेवण संपल्याने पोलिसांना उपाशी राहावं लागलं.

गेल्या अधिवेशनाच्या वेळी देखील हा प्रश्न समोर आला होता, तेव्हा देखील पोलिसांना उपाशी राहावं लागलं होतं. यावेळी पूर्ण खबरदारी घेण्यात आल्याचे सांगण्यात आलं होतं, असं असून देखील पोलिसांना गैरसोय सगन करावी लागली. जेवण वेळेवर मिळालं नाही आणि मिळालं ते अपूरं असल्याची तक्रार समोर आली. या नंतर प्रशासनाला जाग आली असून पोलिसांना जेवण मिळावं म्हणून हलचालींना वेग आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT