
Devendra Fadnavis : …तर मुख्यमंत्री त्यांची इच्छा निश्चित पूर्ण करतील; अजित पवारांना फडणवीसांचा खोचक टोला
maharashtra assembly winter session 2022 : राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूर येथे सुरू होत आहे, या पार्श्वभूमिवर राज्यातील राजकीय वातवरण पेटलं आहे. यादरम्यान आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी तीन आठवड्यांचे अधिवशन व्हावं अशी मागणी बोलून दाखवली. त्यांच्या या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या अधिवेशनामध्ये विदार्भ, मराठवाडा या मगास भागातील प्रश्नावर जास्तीत जास्त चर्चा आम्हाला करायची आहे. विरोधकांना गोंधळ घालायचा असेल तर आम्ही चर्चेचा आग्रह लावून धरू."
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, "अजित पवार म्हणाले तीन आठवड्याचं अधिवेशन का नाही? चार आठवड्यांचं करायला देखील आमची हरकत नाही. पण हा प्रश्न कोणी विचारायचा, ज्यांनी एक आठवड्याचं तरी घेतलं असेल, त्यांनी हा प्रश्न विचारायचा. ज्यांनी एक आठवड्याचंही अधिवेशन घेतलं नाही ते विचारत आहेत तीन आठवड्याचं का नाही?"
हेही वाचा: Ajit Pawar : विरोधकांचा सरकारी चहापानावर बहिष्कार, अजित पवारांनी सांगितलं कारण; म्हणाले..
"पण हरकत नाही. येथे येऊन विदर्भातल्या हवेमुळे त्यांना प्रसन्न वाटल्याने त्यांना एक आठवडा जास्त राहायचं असेल तर मुख्यमंत्री त्यांची इच्छा निश्चित पूर्ण करतील, आणि या अधिवेशनाकरिता विरोधीपक्षाचे जे काही प्रश्न असतील त्यांना आम्ही अभ्यासपूर्ण उत्तरं देऊ, निट चर्चा करू. विदर्भ मराठवाड्याला न्याय मिळवून देऊ" असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
हेही वाचा: प्रेमाचा करुण अंत! लोखंड कापयच्या यंत्रांनं पत्नीचे पन्नास तुकडे; पोलिसांनी सांगितलं कारण