Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Budget 2023: 'तुमच्या संकल्पनेतील महाबजेट'; फडणवीसांची जनतेकडून मागवल्या आयडिया

अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : जनतेच्या मागण्याचं प्रतिबिंब अर्थसंकल्पात दिसावं म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी संकल्पना मांडली आहे. यासाठी त्यांनी नागरिकांना महत्वाचं आवाहन केलं आहे. एका वेबसाईटची लिंक शेअर करत त्यांनी यावर सूचना पाठवण्याचं आवाहन केलं आहे. (Maharashtra Budget 2023 Maha Budget of Your Concept Devendra Fadnavis presented a new idea)

फडणवीसांच्या पोस्टमध्ये म्हटलं की, प्रिय महाराष्ट्र, आपल्या राज्याचा अर्थसंकल्प मुंबईत होणाऱ्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केला जाईल. याची तयारी सुरू झाली आहे. पण अर्थसंकल्प तुमचा आहे आणि तुमचा सहभाग आवश्यक आहे. तर महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2023 साठी तुमच्या कल्पना/सूचना जरूर कळवा. http://bit.ly/MahaBudget23 ही लिंक ओपन करुन त्यात आपल्या सूचना मांडण्याचं आवाहन फडणवीसांनी केलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच राज्याचे अर्थमंत्री म्हणून 2023चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सातत्याने जनतेत राहणे आणि जनतेच्या मतांना सर्वोच्च प्राधान्य देणे, हे त्यांचे कायमच वैशिष्ट्य राहिले आहे.

याच भूमिकेतून या अर्थसंकल्पासाठी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेकडून काही अभिनव संकल्पना आमंत्रित केल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेला अर्थसंकल्प कसा हवा, हे देवेंद्र फडणवीस जाणून घेणार आहेत.

त्यामुळे आता क्षणाचाही विलंब न करता, या अर्थसंकल्पात तुम्हाला काय हवे आणि तुमच्या नाविन्यपूर्ण संकल्पना कोणत्या, यावर तत्काळ लिहा, असंही फडणवीसांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हे ही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

दरम्यान, पुढील वर्षी राज्यात विधानसभा तर पुढील काही महिन्यात मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यापार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प महत्वाचा असेल. मुंबईवर तर योजनांची खैरात होण्याची शक्यता आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! विमानतळावरून १५ नवीन विमानांची उड्डाणे; कुठे आणि कधीपासून? जाणून घ्या...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

SCROLL FOR NEXT