Perfume IED: परफ्युम बॉम्ब! स्फोटासाठी दहशतवाद्यांनी पहिल्यांदाच वापरला नवा फंडा

जम्मू आणि काश्मीर पोलीसही चक्रावले, परफ्युम आईडीमुळं काय होऊ शकतं जाणून घ्या
Perfume IED
Perfume IED

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले आता नवीन राहिलेले नाहीत. पण आपल्या या काळ्या कृत्यांना प्रत्यक्षांत आणण्यासाठी नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारे आयडिया लढवल्या जात आहेत. आता दहशतवाद्यांनी परफ्युम बॉम्बचा वापर केला आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारे स्फोटकं वापरल्यानं जम्मू आण काश्मीरचे पोलिसही आवाक् झाले आहेत. (J&K police recovers perfume IED for first time from terrorist)

पोलिसांच्या माहितीनुसार, पोलिसांनी लष्कर-ए-तैय्यबाच्या एका सदस्याला ताब्यात घेतलं आहे. जो एक सरकारी कर्मचारी देखील आहे. २१ जानेवारी रोजी नरवाल इथं झालेल्या बॉम्ब स्फोटामध्ये या व्यक्तीचा सहभाग असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यामध्ये या व्यक्तीनं पहिल्यांदाच परफ्युम आईडीचा वापर केल्याचं दिसून आलं आहे.

Perfume IED
Satyajit Tambe: सत्यजीत तांबेंना बाळासाहेब थोरातांचा पाठिंबा? पोस्टरमुळे चर्चेला उधाण

जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग पत्रकार परिषदेत सांगितलं की, आम्हाला पहिल्यांदाच एक परफ्युम आईडी आढळून आला आहे. यापूर्वी आम्ही असा बॉम्ब कधीही पाहिलेला नाही. जर हा परफ्युम कोणाच्या हाती आला आणि त्यानं तो उघडण्याचा किंवा तो फवारण्याचा प्रयत्न केला तर आईडीची स्फोट होतो, असा दावाही त्यांनी केला आहे. आमची खास टीम हा आईडी बॉम्ब हाताळत आहे. ज्या आरिफ अहमद नामक व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे त्याच्याकडून अशा प्रकारचे अनेक स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.

हे ही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

कोण आहे आरिफ अहमद?

आरिफ अहमद हा सरकारी कर्मचारी असून तो लष्कर-ए-तैय्यबाचा समर्थक आहे. तो लष्करच्या कासिम नामक म्होरक्याच्या अंतर्गत काम करत होता. या आरिफचा २१ जानेवारी रोजी कटरा येथील शास्त्री नगर आणि जम्मूमधील नरवाल इथं झालेल्या स्फोटात हात होता. त्यानं स्वतःच हे बॉम्ब प्लान्ट केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com