HSC Exam Esakal
महाराष्ट्र बातम्या

HSC Exam : गणित पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरण, पुन्हा परीक्षा होणार?

बारावीचा गणिताचा पेपर फुटल्यामुळे पेपर पुन्हा होणार का याबाबत विद्यार्थी पालकांमध्ये संभ्रम

सकाळ डिजिटल टीम

राज्यात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचा काल (शुक्रवारी) गणिताचा पेपर झाला. हा पेपर सुरु होण्याआधीच बुलडाण्यातील सिंदखेड राजा येथील परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी पेपर फुटल्याची बातमी समोर आली होती. गणिताच्या प्रश्नपत्रिकेची दोन पानं सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे गणिताचा पेपर पुन्हा एकदा घेतला जाईल, अशी चर्चा सुरु होती. याच चर्चांवर राज्य शिक्षण मंडळाकडून अधिकृतपणे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

सिंदखेडराजा येथे पेपर फुटीचा प्रकार असा काहीच घडलेला नाही. कारण तसं काही आढळलेलं नाही. त्यामुळे गणिताचा पेपर पुन्हा होणार नाही, असं स्पष्टीकरण शिक्षण मंडळाकडून देण्यात आलं आहे.

स्पष्टीकरण देताना काय म्हंटलं आहे शिक्षण मंडाळाने?

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेअंतर्गत 3 मार्च 2023 रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द झाली आहे. परंतु, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही, यामुळे इयत्ता 12 वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही असं राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे ही सकाळी साडेदहानंतर प्रसिद्ध झाली आहेत. मंडळ सूचनेनुसार सकाळ सत्रात साडेदहा वाजेपर्यंत व दुपार सत्रात अडीच वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थींनी उपस्थित राहणे बंधनकारक केलेले आहे. त्या वेळेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यास परीक्षा दालनात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे गणित विषयाचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही, असं शिक्षण मंडळाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

संबंधित घटनेबद्दल सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात फिर्याद क्र. ००३७ अन्वये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. त्यामुळे गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही. याची नोंद विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्व संबंधित घटकांनी घ्यावी, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT