Petrol-Diesel Prices Reduced in Maharashtra esakal
महाराष्ट्र बातम्या

केंद्रानंतर राज्याचा मोठा निर्णय! पेट्रोल 2.8 तर डिझेल 1.44 रूपयांनी स्वस्त

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : केंद्र सरकारच्या पाठोपाठ राज्य सरकारने देखील नागरिकांना दिलासा देत व्हॅट (VAT) मध्ये कपात जाहीर केली असून यामुळे ग्राहकांना पेट्रोल डिझेल स्वस्त मिळणार आहे. राज्य सरकारने पेट्रोलच्या दरात 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलच्या दरात 1 रुपये 44 पैशांची कपात केली आहे. (Petrol-Diesel Prices Reduced in Maharashtra)

सर्वांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे, महाराष्ट्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत, पेट्रोल दरांमध्ये प्रतिलिटर 2 रुपये 8 पैशांनी स्वस्त मिळेल तर डिझेल 1 रूपया 44 पैसे प्रतिलिटर स्वस्त होणार आहे. केंद्राकडून काल अबकारी करामध्ये कपात करण्यात आली होती त्यानंतर राज्य सरकारने देखील हा निर्णय घेतला आहे. शनिवारी केंद्र सरकराने पेट्रोलच्या दरात 8 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 6 रुपयांनी कपात केली आहे. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी राज्य सरकारांना करात कपात करण्याची विनंती केली होती.

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारांवर याबाबत दबाव वाढला होता दरम्यान केरळ सरकारने देखील सामान्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकारने सामान्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेताला आहे.

व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतल्याने सरकारवर वार्षिक अडीच हजार कोटींचा बोजा पडणार आहे. दरम्यान काल केंद्र सरकारने आणि आज महाराष्ट्र सरकारने कमी केलेल्या करामुळे पेट्रोल 11 रुपये 58 पैशांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेलचा दर 8 रुपये 44 पैशांनी कमी झाला आहे. व्हॅट कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर मुंबईत पेट्रोल 109 रुपये 27 पैसे प्रतिलिटर दराने मिळेल. डिझेल प्रति लिटर 95 रुपये 84 पैसे मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT