
इंधन दर कपातीवर शरद पवारांची चार शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
केंद्र सरकारने आज सामान्यांना दिलासा देत इंधन दरांबाबत मोठा निर्णय घेत पेट्रोल आणि डिझेलवरील (Petrol and Diesel) उत्पादन शुल्कात मोठी कपात करण्याची घोषणा केलीय, त्यामुळे महागाईच्या काळात काहीसा दिलासा मिळणार आहे.
या दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. पवारांनी काही नसल्यापेक्षा बरं आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 8 रुपये आणि 6 रुपये प्रति लिटरनं कमी करण्याची घोषणा केलीय. यासोबतच उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala Yojana) लाभार्थ्यांना अनुदानही जाहीर करण्यात आलंय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी केलेल्या घोषणेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील कौतुक केलं आहे.
हेही वाचा: मोदी सरकार हे सामान्यांचे सरकार, इंधन दर कपातीनंतर फडणवीसांचे ट्वीट
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारचे कौतुक करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्रातील मोदी सरकार हे या देशातील सामान्य माणसाचे सरकार आहे, हेच पुन्हा एकदापंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सिद्ध केले आहे असे सांगत, गरिब कल्याण हा त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आणि त्यासाठी ते सतत झटत असतात, असे म्हटले आहे, तसेच या निर्णयांमधून त्यांनी हेच प्रत्यंतर पुन्हा एकदा दिले आहे, असे म्हटले आहे.
सोबतच फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की, त्यांनी पुढाकार घेत पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करावी असे म्हटले आहे.
हेही वाचा: ग्राहकांना दिलासा! पेट्रोल 9.50 तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त
Web Title: Sharad Pawar Reaction On Petrol Diesel Price Reduced By Modi Govt
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..