maharashtra politics eknath shinde chief minister swearing in ceremony Invitation to uddhav thackeray
maharashtra politics eknath shinde chief minister swearing in ceremony Invitation to uddhav thackeray  esakal
महाराष्ट्र

एकनाथ शिंदेच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि थोड्याच वेळात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान प्रोटोकॉलनुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या शपथविधी समारंभाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

दरम्यान उध्दव ठाकरे हे या शपतविधी समारंभाला जाणार का? हे आता पाहावे लागणार आहे. यापूर्वी उद्धव ठाकरेंनी बोलताना मला मुख्यमंत्रीपदाचा मोह नसल्याचे सांगितले होते, त्यामुळे ते या शपथविधीला उपस्थित राहतील का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान मागील १० दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या राजकीय गोंधळ अखेर संपला आहे. एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्याने महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयाची घोषणा करण्यात आली.

दरम्यान मुख्यमंत्रीपदी नावाची घोषणा झाल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले आहे की, हा वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीचा विजय…! महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटीबद्ध…असल्याचे म्हटले.

फडणवीसांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परीषदेत शिंदे म्हणाले होते की, "आमदारांचं संख्याबळ पाहता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे ठेवू शकले असते. पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला याबद्दल देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

IPL 2024: रोहित मुंबईकडून वानखेडेवर लखनौविरुद्ध खेळणार शेवटचा सामना? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Fadnavis Interview : ''मी यू टर्न घेतोय, पण शिवसैनिकांना काहीतरी सांगावं लागेल'', शाहांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Jennifer Lopez & Ben Affleck : अवघ्या दोन वर्षात जेनिफर-बेन घेणार घटस्फोट ? मीडिया रिपोर्ट्सने उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT