Eknath Shinde | नवीन मुख्यमंत्र्याची कारकीर्द कदाचित...; अमोल मिटकरींचं ट्वीट चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP amol mitjari on eknath shinde as a next chief minister of maharashtra and devendra fadanvis

नवीन मुख्यमंत्र्याची कारकीर्द कदाचित...; अमोल मिटकरींचं ट्वीट चर्चेत

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळलं आहे, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आज एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठींब्याने मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत. तर देवेंद्र फडवीस हे बाहेर राहणार असल्याची घोषणा खुद्द फडणवीसांनी केली आहे. यादरम्यान मविआ मधील नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन कले जात आहे. (NCP amol mitjari on eknath shinde as a next chief minister of maharashtra and devendra fadanvis)

यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ अल्प असेल का? असा प्रश्न उपस्थित केला आहे, त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील ही घोषणा केल्यानंतर लगेच ट्वीट करत म्हटलं आहे की, "महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कारकिर्द कदाचित (30 जुन 2022 ते 11 जुलै 2022).. #श्री देवेंद्र फडणवीस यांचा मास्टर माईंड", मिटकरींच्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

हेही वाचा: फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे हे आज 30 जुन रोजी संध्याकाठी साडेसात वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, मात्र सुप्रीम कोर्टात ११ जुलै २०२२ रोजी १६ आमदारांच्या आपत्रतेची कारवाईबाबत निर्णय येणार आहे. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाल्यास आणखी काही राजकीय घडामोडी पाहायला मिळू शकतात आणि आपल्याला नवीन ट्वीस्ट पाहायला मिळू शकतो. या पार्श्वभूमीवर हा फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक असल्याचे मिटकरी म्हणाले आहेत.

हेही वाचा: मुख्यमंत्रीपदी वर्णी लागताच शिंदेंचं पहिलं ट्वीट; म्हणाले.. ''हा...

Web Title: Ncp Amol Mitjari On Eknath Shinde As A Next Chief Minister Of Maharashtra And Devendra Fadanvis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top