NCP Jayant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil ED Notice: लग्नाच्या वाढदिवशीच जयंत पाटलांना मिळाली ईडीची नोटीस; म्हणाले...

जयंत पाटील यांना ईडीनं नोटीस पाठवली असून लवकरच ते ईडी समोर हजेरी लावणार आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीनं नोटीस पाठवली असून या नोटीशीवर पाटील यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना पाटील म्हणाले, माझं आयुष्य हे खुली किताब आहे, त्यामुळं मला भीतीचं कारण नाही. ईडीच्या चौकशीला मी सर्वतोपरी मदत करेन. (Maharashtra Politics NCP Jayant Patil comment on ED Notice)

पाटील म्हणाले, "काल माझ्या लग्नाचा वाढदिवस होता त्यात मला ईडीनं नोटीस पाठवली. संध्याकाळी ६ वाजता मला नोटीस आली, या नोटीसमध्ये काही कारण सांगितलेलं नाही. पण त्याचा फाईल नंबर काढून बघितला तर असं दिसतंय की, आयएलएफएस (ILFS) नावाची कुठली तरी संस्था आहे. यासंदर्भातील ही केस आहेत. या कंपनीचा माझ्याशी आयुष्यात कधी संबंध आला नाही. मी त्यांच्याकडून कधी कर्ज घेतलं नाही, त्यांच्या दारात मी कधी गेलेलो नाही"

काही दिवसांसाठी वेळ मागणारं दिलं पत्र

काल एका हवालदारानं सध्याकाळी ६ वाजता मला येऊन नोटीस दिली. माझ्या त्याचाशी काही संबंध नाही. पण आता त्यांनी चौकशीसाठी बोलवलंच आहे तर चौकशी सामोरं जाऊ. दोन तीन दिवस घरातील जवळच्यांची लग्न आहेत. त्यामुळं ही लग्न झाल्यानंतरची वेळ मी मागणार आहे, याबाबतच पत्र मी आज ईडीला पाठवून दिलं आहे, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

माझं आयुष्य खुली किताब

ईडीची नोटीस कशासाठी येते हे भारतात सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळं त्यांना जे सोईची तारीख वेळ वाटते तशी ते नोटीस देतात. त्याला काही इलाज नाही. माझं सर्व राजकीय आयुष्य हे खुली किताब आहे, यामुळं मला काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळं मला खात्री आहे की, त्यांना आवश्यक असणारी सर्व माहिती मी देईनच पण मी कधीही मनी लॉन्डरिंग केलेलं नाही त्यामुळं मला काहीही भीती नाही, असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT