महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: निवडणूक आयोगाकडून चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया म्हणाले...

शिवसेना हे नाव वापरण्यासही दोन्ही गटाला मनाई करण्यात आली आहे

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काल (शनिवारी) शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आलं आहे. त्याचबरोबर शिवसेना हे नाव वापरण्यासही दोन्ही गटाला मनाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या प्रतिक्रियेनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून पुढील संघर्षास सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केलीय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत जिंकून दाखवणारच असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. इन्स्टाग्रामवरच्या या पोस्टला शिवसैनिकांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय. पुढील संघर्षासाठी आम्ही तयार असल्याचेही शिवसैनिकांनी या पोस्टवर कमेंट करत म्हटलं आहे. शिवसेना संघर्षातून तयार झाली असून यापुढेही ती संघर्षातून पुढे जाणार असल्याचं शिवसैनिकांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणातून प्रतिक्रियांना वेग आला आहे. शिवसैनिक, पक्षाचे कार्यकर्ते यांनी आपण लढू. या लढाईत आम्ही पक्षासोबत आहोत असंही म्हंटलं आहे. सोशल मीडियावरही आमचे चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत असं म्हणत शिवसैनिकांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

करोडपती सासऱ्याने असं काय केलं की ३० वर्षीय सुनेनं थेट रचला कट, ६ लाखांची सुपारी देत संपवलं; धक्कादायक माहिती उघड

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT