Shivsena: निवडणूक आयोगाच्या निर्णयातील महत्वाचे 10 मुद्दे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena: निवडणूक आयोगाच्या निर्णयातील महत्वाचे 10 मुद्दे

Shivsena: निवडणूक आयोगाच्या निर्णयातील महत्वाचे 10 मुद्दे

महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत एकनाथ शिंदे यांनी बंड करत संपूर्ण पक्ष माझ्यासोबत असल्याचं म्हणत शिवसेना पक्षावर आपला हक्का सांगितला होता. त्यामुळे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण या पक्ष चिन्हाचा मुद्दा निवडणूक आयोगाकडे गेला होता. मात्र काल निवडणूक आयोगाने हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय़ घेतला आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयातील महत्वाचे हे आहेत 10 मुद्दे

1) निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं.

2) दोन गटांपैकी कोणीही शिवसेना हे नाव वापरू शकणार नाही.

3) शिवसेना हे नाव दोन्ही गटांना घेता येणार नाही. मात्र, शिवसेनेशी संबंधित कोणतही नाव घेता येईल.

4) उद्या (सोमवार)पर्यंत नव्या चिन्हाची निवड करण्यासाठीची मुदत निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटाला देण्यात आली आहे.

हेही वाचा: Shivsena Symbole Freeze : शिवसेनेचं चिन्ह गोठवण्यावरून अंधारेंनी भाजपला दिला इशारा

5) निवडणूक आयोगानं घेतलेला आजचा निर्णय हा अंधेरी येथील पोटनिवडणूक आणि त्यापुढेही निवडणूक आयोगाचा निर्णय येईपर्यंत कायम राहणार आहे.

6) निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेला निर्णय हा अंधेरी पोटनिवडणूक आणि त्यापुढे निवडणूक आयोगाकडून निर्णय येईपर्यंत कायम राहील.

7) शिंदे गट किंवा ठाकरे गट यांच्यापैकी एकाने माघार घेतली तर दुसऱ्या गटाला शिवसेना नाव देण्यात येईल. मात्र, कोणत्याच गटाने माघार न घेतल्यास "शिवसेना"नाव आणि राखीव असलेले "धनुष्यबाण" हे चिन्ह दोन्ही गटांपैकी कोणत्याही गटाला वापरता येणार नाही.

हेही वाचा: Shivsena Symbol Freeze : शिवसेनेकडे अजूनही पर्याय एक शिल्लक आहे?

8) दोन्ही गटाला नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी तीन तीन पर्याय दिले जाणार आहेत, असं देखील निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

9) दोन्ही गटांना अंधेरी पोटनिवडणुकीत निवडणूक आयोगाने संमती दिलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून चिन्ह वापरावं लागेल.

10) सद्य परिस्थिती पाहता चिन्ह आणि पक्षाबाबत निर्णय घेण्यासाठी जास्त वेळ नाही.