Maharashtra Weather update esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Weather update: आणखी पाच दिवस राज्यात पावसाचा अलर्ट; गारपिटीचा इशारा...

अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा संकटात सापडला

सकाळ डिजिटल टीम

राज्यात ऐन रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असताना अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. अशातच आता पुढील पाच दिवसात गारपीटाचा इशारा दिला आहे. पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. (Maharashtra Weather update imd alert heavy rain next five day orange alert in the state )

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस म्हणजे सोमवार दि.२० मार्चपर्यंत कोकण वगळता महाराष्ट्रात तूरळक ठिकाणी वीजा आणि वारा यासहित किरकोळ पावसाच्या शक्यता आहे. त्या बरोबरच मध्य महाराष्ट्र(नंदुरबार ते सोलापूर), मराठवाड्यात ( छत्रपती संभाजीनगर ते नांदेड पर्यंत ) आज गारपीटीची शक्यता जाणवते, तर विदर्भात मात्र आजच्या बरोबर उद्याही गारपीट होवू शकते असे सांगण्यात येत आहे.

राज्यात पुढील 2 ते 3 दिवस गडगडाटासह पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला असून खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, कोल्हापूर, नंदूरबार, विदर्भ, मराठवाडा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आदी भागांत पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार, असा सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला होता. हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरवत राज्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

राज्याच्या विविध भागात अचानक झालेल्या बदलामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना अचानक अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. मुंबईतही गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गर्दीच्या वेळी CSMT रेल्वे स्थानकात संतापजनक प्रकार! प्लॅटफॉर्ममधील रुळावर व्यक्ती झोपला, समोरून ट्रेन आली अन्...; VIDEO VIRAL

Thane Crime: ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी मोहीम, वर्षभरात ७ कोटींचा ड्रग्ज जप्त, १४६ आरोपींना अटक

लग्नाला ११ वर्ष पूर्ण; तरीही पतीसोबत का नाही राहत अमृता खानविलकर? कारण सांगत म्हणाली, 'तो त्याच्या आईजवळ...'

Latest Marathi News Update : भारतात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X क्रॅश

Thane News: कल्याण–शिळफाटा रस्त्यावरील मेट्रो कामाचे परिक्षण करा, मुलुंड दुर्घटनेनंतर प्रवाशांची मागणी

SCROLL FOR NEXT