Manoj Jarange 
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange: "धनंजय मुंडेंना देखील मराठ्यांचे मतदान..."; मनोज जरांगेंचा इशारा! भुजबळ, नारायण कुचेंवर देखील हल्लाबोल

Sandip Kapde

Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे राज्यभर सभा घेत आहेत. आज जरांगे यांनी जालन्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला. २४ डिसेंबरच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या. तसेच गुन्हे मागे घ्या, नाहीतर चर्चेला येऊ नका, अशी मागणी देखील मनोज जरांगे यांनी केली.

मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा टीका केली. मराठा आणि ओबीसी बांधव सुखात नांदत असताना दंगली भडकवणारा मंत्री म्हणजे भुजबळ. त्यांनी महापुरुषांच्या जाती काढल्या. राजद्रोह सारखा प्रकार हा माणूस करत आहे. एवढ्या खालच्या स्तरावर जाणारा माणूस महाराष्ट्रात कधीच पाहीला नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.

"सगळ्यात वाया गेलेला माणूस म्हणजे छगन भुजबळ. मी जातीवाद करत नाही. मात्र भुजबळ जातीवाद निर्माण करत आहेत. येवल्यातून पाठवेले इथं आवाज करत आहेत. मात्र ते पिलावळ आमच्यासमोर शांत बसत आहेत. मराठ्यांच्या नोंदी सापडत आहेत. तरी त्यांना आरक्षण न देण्याचा चंग या माणसाने बांधला. सरकार भुजबळांच्या दबावात आले होते. त्यामुळे ७० वर्ष आरक्षण मिळाले नाहीत", असे मनोज जरांगे म्हणाले.

ओबीसीतून मराठा आरक्षण घेणार तुम्हाला काय करायचं ते करा. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर तुम्हाला बाथरुम देखील उघडता येणार नाही, लक्षात ठेवा. मराठा समाजासोबत दगा केला तर तुम्हाला सुट्टी नाही. भुजबळांच्या दबाखाली येवून मराठा समाजाचं वाटोळं करु नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार तुम्हाला शेवटची विनंती आहे. छगन भुजबळ यांच्या दबावात येऊन तुम्ही जर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर आणि मराठ्यांचा घात केला. तर तुमची देखील गाठ मराहाराष्ट्रातील मराठ्यांशी आहे, असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.

२ तारखेला एक महिना पूर्ण होत आहे. अंतरवालीत गुन्हे दोन दिवसात आणि महाराष्ट्रातील सर्व गुन्हे दोन महिन्यात मागे घ्या. एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडून एका महिन्यात ४ लोक आले. उदय सामंत, धनंजय मुंडे, संदिपान भुमरे, अतुल सावे आले. यांनी सांगितले आपले गुन्हे मागे घेण्यात येतील. मात्र आंतरवालीतील कार्यकर्त्यांना का अटक केली? खोटं बोलून गद्दारी करु नका, असे जरांगे म्हणाले.

अंतरवालीत प्राणघात हल्ला आम्ही विसरलो नाही. आम्हाला सर्वांना अटक करा आणि तुमच्या इच्छा पूर्ण करा, असे देखील जरांगे म्हणाले. लातूरला १४४ लागू केली. मात्र सरकारला इशारा आहे. लातुरात कार्यक्रम होणार. स्थानिक प्रशासन अटक करत आहे की गृहमंत्री सांगत आहेत? प्रश्न देखील जरांगे यांनी उपस्थित केला. (Latest Marathi News)

मनोज जरांगे यांनी नारायण कुचेंवर देखील हल्लाबोल केला. सरकारच्या शिष्टमंडळात नारायण कुचे देखील होते. छगन भुजबळ म्हणताता नारायण कुचेंवर अन्याय होत आहे. कुचे रोज आमच्यासोबत बोलत आहेत. मला लोक फिरु देत नाहीत. मी तुमच्यासोबत येऊ का?  असे कुचे म्हणताता अन् तिकडे ओबीसी नेत्यांसोबत काड्या लावतात. मराठ्यांना खुट्या मारु नका. कुचे काड्या लावायचे काम करतात. मी त्यांना खूप मानायचो, असे जरांगे म्हणाले.

नारायण कुचे यांनी मला सांगितलं बीडचे लोक धनंजय मुंडे अटकवणार म्हणाले. धनंजय मुंडेंना देखील मराठ्यांचं मतदान आहे. ते कुठं जाणार त्यांना देखील बघू. नारायण कुचे यांनी आमचा गेम करु नये नाहीतरल ऊस तोडायला जावे लागले, असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT