Manoj Jarange Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange Patil: आमच्या मंडपाला, व्यासपीठाला हात लावला तर गृहमंत्र्याला...; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांच्या आंदोलनस्थळी मंडप काढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मनोज जरांगे उपाचार सोडून जरांगे अंतरनवाली सराटीला निघाले होते.

Sandip Kapde

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांच्या आंदोलनस्थळी मंडप काढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मनोज जरांगे उपाचार सोडून जरांगे अंतरनवाली सराटीला निघाले होते. मात्र पोलिसांच्या आश्वासनानंतर ते थांबले. मनोज जरांगे पुन्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्रमक झाले आहेत.

मनोज जरांगे म्हणाले पुन्हा एकदा सांगतो तुमच्या हातातील संधी गेली नाही. तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. सगे सोयेऱ्यांची अंमलबजावणी करा, ओबीसीतून आरक्षण द्या. अंगावार येण्याचा प्रयत्न करु नका. मी हॉस्पीटल सोडलं अन् माझ्या अंगाला जरी धक्का लागला तर बघा. मी मराठा समाजासाठी मान देखील कापून द्यायला तयार आहे.

आमचे लोक सरकारने सोडावे. आमच्या मंडपाला, व्यासपीठीला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावणार नाही असा शब्द द्यावा. जर लावाला तर गृहमंत्र्याला सुट्टी नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार वाद चांगलाच वाढला आहे. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्याने ते बॅकफूटवर आल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाच्या SIT तपासाची बातमी समोर आली आहे. अशा परिस्थितीत मराठा मनोज जरंगे पाटील यांनी संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी भाजप आमदारांनी केली हे विशेष. या मागणीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले. या आदेशावरून नेत्यांचीही एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी जरांगे पाटील म्हणाले.

जोपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाही, असे वक्तव्य जरंगे यांनी केले. रविवारी (25 फेब्रुवारी) मराठा नेते मनोज जरंगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अपशब्द वापरले आणि त्यांच्यावर अनेक खळबळजनक आरोपही केले. यानंतर या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे.

जरंगे येथील या मराठा आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली. अशा परिस्थितीत आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या प्रकरणाच्या एसआयटी तपासाला मंजुरी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

Tankerman Salman Pathan : गावचा पाणी पुरवठा झाला कमी; अगरवाडगावची तहान भागवतोय ‘टँकरमॅन’ सलमान

SCROLL FOR NEXT