Manoj Jarange Patil Sabha esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange Patil: आरक्षण कसे घ्यायचे, हे मराठ्यांना चांगले माहित; ओबीसीतूनच आरक्षण घेणार

सकाळ डिजिटल टीम

Maratha Reservation: ‘‘मनोज जरांगे लहान आहेत, त्यांचा आरक्षणाबाबत जास्त अभ्यास नाही, आपण त्यांना ओळखत नाही’ या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले.

अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे बोलताना ते म्हणाले, ‘‘राज्यात कोणीही असे काही बोलून माती कालविण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही केव्हा म्हणालो, ते आम्हाला ओळखतात?. मराठा समाज ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे. आरक्षण कसे घ्यायचे, हे मराठ्यांना चांगले माहिती आहे. आमचा किती अभ्यास आहे. हे राज्यातील सर्वसामान्य मराठ्यांना चांगले माहीत आहे. राज्यातील गोरगरिबांचे कल्याण होतंय तर होऊ द्या. आता आरक्षण मिळणार आहे. काहीही वक्तव्ये करून गोरगरिबांच्या ताटात माती कालवायचे काम कुणी करू नये.’’

भुजबळ हे ‘पनवती’

नाशिक जिल्ह्यात नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणीसाठी गेलेल्या मंत्री छगन भुजबळ यांना आज मराठा आंदोलकांनी विरोध केला. त्यावर बोलताना जरांगे म्हणाले, ‘‘छगन भुजबळ हे पनवती असून त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल. मंत्री बांधावर गेल्यावरच शेतकऱ्यांचे चांगले होते असे काही नाही. प्रशासन आहे ना? प्रशासनाने पंचनामे करायला पाहिजेत’.

मनोज जरांगेंची आज जालन्यात सभा

मराठा आरणक्षासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी (ता.१) जालना शहरातील पांजरपोळ मैदानावर सभा होणार आहे. सभेची तयारी पूर्ण झाली असून पोलिस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त ठेवणार आहे. यानिमित्त काढण्यात येणाऱ्या फेरीवर सीसीटीव्हीसह आठ ड्रोन कॅमेऱ्यांची नजर राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

Marathi News Live Updates : महाकाळा परिसरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

SCROLL FOR NEXT