Chhagan Bhujbal on manoj jarange patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : आझाद मैदानासाठी मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष होण्याची शक्यता; दोन्ही समाज भूमिकेवर ठाम

मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील हे येत्या २० जानेवारीपासून मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. मराठा समाजाच्या वतीने आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे.

संतोष कानडे

मुंबईः मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील हे येत्या २० जानेवारीपासून मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. मराठा समाजाच्या वतीने आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. परंतु याच मैदानाच्या मागणीवर ओबीसी समाजदेखील ठाम आहे. त्यामुळे मैदानासाठी मराठा-ओबीसी संघर्ष होऊ शकतो.

मराठा समाजाच्या वतीने आझाद मैदान, बीकेसी मैदान आणि शिवाजी पार्कवर आंदोलनाची तयारी सुरु करण्यात आलेली आहे. मागच्याच आठवड्यात मराठा शिष्टमंडळाने तिन्ही मैदानांची पाहाणी केली. मात्र आझाद मैदानासाठी ओबीसी समाज आग्रही आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी आधीच आझाद मैदानासाठी पोलिसांना पत्र दिल्याची माहिती आहे. 'टीव्ही ९'ने हे वृत्त दिलं आहे.

आता पोलिस काय भूमिका घेतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. तीन कोटी लोक मुंबईत येतील, असा दावा मराठा समन्वयकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे तिन्ही मैदानं आवश्यक असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र ओबीसी समाजाच्या नेत्यांनीही २० तारीखेला आंदोलनाची हाक दिली आहे.

मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे. सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळावं, ही एक प्रमुख मागणी पुढे आलेली आहे. त्यामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आहे.

दरम्यान, गुरुवारी शिर्डी येथे कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलताना शरद पवारांनी येत्या चार ते आठ दिवसांमध्ये सरकार आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं होतं. सरकारनेच जरांगेंना लेखी दिल्यामुळे अडचण निर्माण केल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर... आई होण्याबद्दल पहिल्यादांच बोलली सई ताम्हणकर; म्हणते- आमच्या क्षेत्रात...

Pune University Result Delay: पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील निकाल १०० दिवसांनंतरही प्रलंबित; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT