Meera Manjhi: मीरा मांझींनी देवघरात ठेवला PM मोदींना दिलेला चहाचा कप, दिला देवाचा दर्जा

Meera Manjhi: अयोध्येतील मीरा मांझींनी देवघरात ठेवला PM मोदींना दिलेला चहाचा कप, मोदींना दिला देवाचा दर्जा काय म्हणाली वाचा सविस्तर
Meera Manjhi
Meera ManjhiEsakal

अयोध्या, उत्तर प्रदेशातील मीरा मांझी यांना 30 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत कोणी ओळखत नव्हते. देश आणि उत्तर प्रदेश सोडा, रणमोचन घाट वॉर्डातही लोकांना त्यांची माहिती नव्हती. कंधारपूर मोहल्ला येथे राहणारी मीरा फुलं विकून उदरनिर्वाह करते. कुटुंबही फुलं विकण्याचे काम करते. पण, मीराचे आयुष्य एका तासातच बदलून गेले. अयोध्या धाम रेल्वे स्थानकाच्या उद्घाटन समारंभाला जात असताना मीरा मांझी यांना त्यांच्या घरी कोणीतरी नेता येणार असल्याचे सांगण्यात आले.

त्यानंतर तासाभरानंतर जे घडलं ते मीरासाठी स्वप्नासारखं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः त्यांच्या घरी आले होते. मीराने त्यांना चहा दिला. त्यानंतर सर्वत्र तिच्या चर्चा सुरू झाल्या. पंतप्रधान मोदींनी ज्या चहाच्या कपमध्ये चहा प्यायला तो कप त्यांच्या पूजा घरात ठेवण्यात आला आहे.

Meera Manjhi
Free Aadhaar Update : आधार अपडेट ते आयटीआर भरण्यापर्यंत... मोफत होतील ही सगळी कामं! जाणून घ्या डेडलाईन

मीरा उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी

मीरा मांगी या केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेच्या 10 कोटीव्या लाभार्थी आहेत. महिलांना धुरापासून मुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजना सुरू केली होती. ही योजना बऱ्यापैकी यशस्वी झाली आहे. गॅस सिलिंडरच्या माध्यमातून लाकडाच्या चुलीतून कुटुंबांची सुटका करण्यात आली आहे. मीरा मांझी यांनाही गॅस कनेक्शन मिळाल्याने आनंद झाला.

पण, पंतप्रधानांनी त्यांच्या घरी भेट दिल्यामुळे त्यांची केवळ यूपीमध्येच नाही तर देशभरात प्रसिद्धी मिळाली आहे.ती केंद्राच्या योजनेची आयकॉन बनली आहे. एमबीसी समुदायातून म्हणजेच अत्यंत मागासवर्गीय निषाद समुदायातून आलेल्या मीराने पंतप्रधान मोदींचे तिच्या पद्धतीने स्वागत केले होते. त्यांच्या स्वागताने पंतप्रधान मोदीही खूश झाले.

Meera Manjhi
Vinod Upadhyay shot Dead : युपीत आणखी एका गुन्हेगारांचं एन्काऊंटर! एक लाखाचे बक्षीस असेला गँगस्टर ठार

पंतप्रधानांनी नववर्षाची दिली भेट

अलीकडेच, पंतप्रधानांनी मीराच्या कुटुंबीयांना भेटवस्तू पाठवून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यात चहाचा सेट, रंगांसह चित्रकलेचे पुस्तक, यासह इतर भेटवस्तूंचा समावेश आहे. मोदींनीही पत्र लिहून त्यांचा अनुभव सांगितला. मोदींनी पत्रे आणि भेटवस्तू पाठवल्यावर मीरा खूप आनंदी दिसत होती.

याबाबत बोलताना मीरा म्हणाली, मी खूप आनंदी आहे. पंतप्रधान मोदींनी आम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तुमच्या कुटुंबीयांना भेटून मला खूप आनंद झाल्याचे त्यांनी पत्रात लिहिले आहे.त्यांनी आमच्या मुलांसाठी खेळणी दिली आहेत. वीर आणि नैनासाठी बॅग दिल्या आहेत. याशिवाय खेळणी दिली आहेत. आम्हाला ते खूप आवडले. आमची मुलंही खूप आनंदी आहेत. आम्ही हात जोडून त्याचे आभार मानतो.

Meera Manjhi
Weather Update: हिवाळ्यात पावसाळा! उत्तर प्रदेश-बिहारमध्ये कडाक्याच्या थंडीत पावसाची शक्यता; धुक्यांमुळे अनेक विमान उड्डाणे रद्द

मीरा अचानक प्रकाशझोतात आली आहे. त्यांच्या घरी प्रसारमाध्यमांची गर्दी पाहायला मिळते. ती तिच्या साध्या शैलीत सर्वांना भेटत आहे. या अचानक चर्चेत येण्याचे कारण ती पंतप्रधान मोदी असल्याचे सांगत आहे. अशा परिस्थितीत मोदींचे घरी येणे हा देवाचा योगायोग असल्याचे तिने म्हटले आहे.

ज्या कपमध्ये त्यांनी मोदींना चहा दिला तो कप त्यांनी त्यांच्या घरातील देवघरात ठेवला आहे. ती म्हणते की, आमच्यासाठी ते देव म्हणून आले. त्याच्या आगमनापासून हे सर्व घडत आहे. मीरा आणि तिच्या कुटुंबीयांनाही आयुष्मान कार्ड मिळाले आहे. तसेच, तिला आधीच घरकुल योजना, पिण्याचे पाणी आणि इतर योजनांचा लाभ मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com