Maratha Reservation Manoj Jarange-Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

माजी खासदार राठोडांनी मांडलेला 'नऊ'चा फॉर्म्युला जरांगेंनी नाकारला; नेमकं काय आहे फॉर्म्युल्यात?

ओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे. त्यात मराठा समाजाला नऊ टक्के आरक्षण (Maratha Reservation) द्यावे.

सकाळ डिजिटल टीम

२७ टक्के ओबीसी आरक्षणात मराठे आले तर हे आरक्षण पुरेसे ठरणार नाही.

छत्रपती संभाजीनगर : ‘ओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे. त्यात मराठा समाजाला नऊ टक्के आरक्षण (Maratha Reservation) द्यावे, नऊ टक्के भटक्या जमातींसाठी तर नऊ टक्के बारा बलुतेदारांसाठी’ असा फॉर्म्युला माजी खासदार हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी सोमवारी मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासमोर मांडला.

जरांगे यांनी हा ‘फॉम्युला’ अमान्य करीत मराठ्यांची लोकसंख्या ४० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण हवे. या ‘फॉर्म्युल्या’मुळे अर्ध्याच मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असे सांगत याला नकार दिला.

सध्या जरांगे यांच्यावर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राठोड यांनी त्यांची तेथे भेट घेतली. यात त्यांनी मराठा समाजाला ‘ओबीसी’ कोट्यातून आरक्षण कसे मिळेल, या विषयाची मांडणी केली. या संदर्भात त्यांनी तयार केलेला आरक्षणाचा ‘फॉर्म्युला’ सांगितला.

राठोड म्हणाले, ‘‘२७ टक्के ओबीसी आरक्षणात मराठे आले तर हे आरक्षण पुरेसे ठरणार नाही. त्यामुळे आधी ओबीसींचे आरक्षण वाढवण्यासाठी लढा दिला पाहिजे.’’ त्यांचे हे म्हणणे जरांगे यांनी फेटाळत ‘‘आधी आम्ही ओबीसीमधून आरक्षण घेऊ आणि मग आरक्षण वाढवण्यासाठी लढा देऊ,’’ असे स्पष्ट केले.

ते म्हणाले, ‘‘सरसकट या शब्दावरून काही ओबीसी नेते बाऊ करीत आहेत. आमच्या ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना आरक्षण द्या, अशी मागणी सगळ्या गावांमध्ये होत आहे. लोकसंख्येच्या प्रमाणातच आरक्षण हवे आणि तेही ओबीसीमधूनच,’’ असे त्यांनी राठोड यांना सांगितले.

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावा

‘‘मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिली. त्यामुळे आता २० जानेवारीपासून आंदोलन करणार आहे. आता मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही. राज्यातील साखळी उपोषण थांबवून समाज बांधवांनी मुंबईकडे कूच करण्याची तयारी ठेवावी,’’ असे आवाहनही जरांगे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : भीषण अपघात! भरधाव येणाऱ्या मॅजिक व्हॅनची ट्रकला धडक, नऊ जणांचा जागीच मृत्यू

सायली-प्रिया दोघीही आई होणार! ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्वीस्ट, प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले...

Ghodegaon Accident: घोडेगाव–भीमाशंकर रस्त्यावर भीषण अपघात; समोरासमोर धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू, घोडेगाव परिसरात हळहळ..

Riyan Parag:'... तर आम्ही प्लेऑफमध्ये पोहचणार नाही', दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला रियान पराग?

राज्यातील पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी, विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक जाहीर, कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT