घरी निघालेल्या पालकमंत्र्यांच्या गाडीवर भिरकावली बाटली; पोवई नाक्यावर 100 पोलिस झाले गोळा, काय होतं बाटलीत?

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर वॉच ठेवला जात असल्याचे प्रकरण दोन वर्षांपूर्वी समोर आले होते.
Shambhuraj Desai Satara Police
Shambhuraj Desai Satara Police esakal
Summary

संबंधिताने कोण येतेय, कोण जातेय, हे न पाहता ती बाटली भिरकावली; परंतु ती नेमकी पोलिस वाहनांच्या ताफ्यातून घराकडे निघालेल्या पालकमंत्र्यांच्या गाडीवर पडली.

सातारा : फुटाणे विकणाऱ्या व्यक्तीशी झालेल्या वादातून एका माथेफिरूने हवेत भिरकावलेली पाण्याची बाटली नेमकी जिल्हाधिकारी कार्यालयातून निवासस्थानाकडे निघालेल्या पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या गाडीवर पडली. या प्रकारामुळे मात्र काल (शुक्रवार) सायंकाळी पोलिस (Satara Police) दलाची तारांबळ उडाली.

शहर पोलिस ठाणे (Satara Police) व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह शंभरहून अधिक पोलिस गोळा झाल्याने पोवई नाका परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. दरम्यान, रात्री उशिरा नम्या यंत्र्या भोसले (रा. फडतरवाडी, ता. सातारा) यास पोलिसांनी चौकाशीसाठी ताब्यात घेतले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर वॉच ठेवला जात असल्याचे प्रकरण दोन वर्षांपूर्वी समोर आले होते. त्या वेळीही पोलिसांची तारांबळ उडाली होती.

Shambhuraj Desai Satara Police
Kirit Somaiya : सोनिया-राहुल गांधींचा जयजयकार करणाऱ्यांना आता राम आठवला का? सोमय्यांचा ठाकरे-राऊतांवर घणाघात

त्यानंतर महिन्यापूर्वी शंभूराज देसाई यांच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न झाला होता. ती घटनाही गाजली होती. पालकमंत्र्यांबाबतच्या अशा प्रकारानंतर पोलिस अडचणीत आले होते. त्यामुळे पालकमंत्र्यांचा विषय म्हटले, की वरिष्ठ काय करतील, या भीतीने पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसते. तशीच त्रेधातिरपीट आज अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाली.

काल सायंकाळचे पोवई नाक्यावरचे चित्र नेहमीप्रमाणेच होते. वाहनांच्या गर्दीची ये-जा सुरू होती. त्यातच पालकमंत्री येतायत म्हटल्यावर पोलिस दल अलर्ट मोडवर होते. घाईगडबडीत घराच्या वाटेवर असलेल्या वाहनधारकांना पालकमंत्र्यांचा ताफा जाईपर्यंत अडविण्यात आले होते; परंतु याच वेळी एकाचा पोवई नाक्यावर असलेल्या शेंगदाणे-फुटाण्याच्या गाडीवर वाद सुरू होतो. विक्रेत्याला तो शेंगदाणे-फुटाणे मागत होता; परंतु तो त्याला देत नव्हता. त्यावरून दोघांची हमरीतुमरी सुरू होती. यावेळी संबंधित व्यक्तीला राग अनावर झाला. त्याने हातात असलेली पाण्याची बाटली हवेत भिरकावून दिली.

Shambhuraj Desai Satara Police
Uday Samant : विधिमंडळ अधिवेशनात स्वतःचा रेकॉर्ड मोडीत काढत मंत्री सामंतांनी केला नवा रेकॉर्ड; असं नेमकं काय घडलं?

संबंधिताने कोण येतेय, कोण जातेय, हे न पाहता ती बाटली भिरकावली; परंतु ती नेमकी पोलिस वाहनांच्या ताफ्यातून घराकडे निघालेल्या पालकमंत्र्यांच्या गाडीवर पडली. खाडकन आवाज झाला, त्यामुळे त्यांच्या सुरक्षा रक्षकाच्या काळजाचा ठोका चुकला. घटना घडल्यावर पालकमंत्र्यांची गाडी थांबली. ते उतरले नाहीत; परंतु दार उघडून कोण बाटली फेकतेय बघा, असे म्हणून ते निघून गेले. ताफ्यातील पोलिसांनी आजूबाजूला पाहिले; परंतु कोणी आढळून आले नाही. त्यानंतर पोलिसांची खरी धावपळ सुरू झाली.

सर्वांना मेसेज गेले. सायंकाळच्या वेळी जरा निवांत असलेल्या सगळ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. असेल तेथून अधिकारी व कर्मचारी पोवई नाक्यावर गोळा झाले. चौकशी सुरू झाली. कोणी हल्ला तर केला नाही ना, या शंकेने पोलिस धास्तावले होते. पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षकांसह अनेक अधिकारी व कर्मचारी पोवई नाक्यावर गोळा झाले होते. त्यामुळे काय झाले, याची चर्चा संपूर्ण शहरात सुरू झाली होती.

Shambhuraj Desai Satara Police
'मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं असेल, तर उदयनराजेंनाच साताऱ्यातून उमेदवारी द्या'; कोणी केलीये मागणी?

पोलिसांच्या जिवात जीव आला

गोपनीय माहितीबाबत फेल्युअर नको, ही पोलिसांची भीती; परंतु शेंगदाणे-फुटाणे विक्रेत्यांशी चर्चा केल्यावर पोलिसांच्या जिवात जीव आला. बाटली फेकणारा माथेफिरू होता, हे त्याच्या चर्चेतून समोर आले. शेंगदाणे दिले नाहीत म्हणून त्याने मागे-पुढे न पाहता बाटली भिरकावली होती, हे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यातून एकाने बाटली भिरकावल्याचे समोर आले; परंतु त्याची ओळख पटली नव्हती. सीसीटीव्ही फुटेज व विक्रेत्याकडून संबंधिताचे वर्णन घेऊन शोध सुरू केला; परंतु यादरम्यान पोवई नाक्यावर पोलिसांची मोठी गर्दी झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com