Maratha Reservation Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: आरक्षण कधी मिळणार? सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंना टाईम बॉन्ड देण्याची शक्यता

सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

सरकारचं शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. आरक्षणाची डेडलाईन 24 डिसेंबर की 2 जानेवारी यावर चर्चा करणार आहे. उदय सामंत, संदिपान भुमरे आणि अतुल सावे आज जरांगे पाटील यांना भेटणार आहेत.

मराठा आरक्षण आणि अंतरवाली सराटीमधील ठरलेल्या गोष्टींबाबत चर्चा करण्यासाठी आज सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. आत्तापर्यंत तीन वेळा भेट रद्द झाल्यानंतर आज हे शिष्टमंडळ आज छत्रपती संभाजीनगर शहरात पोहचणार आहे. तर आजच्या या भेटीवेळी शिष्टमंडळाकडून जरांगे यांना टाईम बॉन्ड देण्याची जाण्याची शक्यता आहे. आज मनोज जरांगे आणि सरकारचं शिष्टमंडळ यांच्यातील आजची भेट महत्त्वाची समजली जात आहे.

सरकारचं शिष्टमंडळ आज (9 नोव्हेंबर) भेटीसाठी जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून आपल्याला मिळाली असल्याचं खुद्द जरांगे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. जरांगेंवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात जाऊन सरकारचं शिष्टमंडळ त्यांची भेट घेतील.

या शिष्टमंडळात जरांगे पाटील यांच्या भेटीला सरकारचे शिष्टमंडळ जाणार आहे. चार मंत्र्यांचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात मंत्री उदय सामंत, शंभूराजे देसाई, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे आणि अतुल सावे यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांना भेटणार असल्याची मागील तीन दिवसांपासून चर्चा सुरू आहे. सुरुवातीला 6 नोव्हेंबर रोजी हे शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीसाठी येणार होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच, 7 नोव्हेंबरला सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला येणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आलं. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगर दौऱ्यावर असल्याने, पुन्हा एकदा हा दौरा देखील रद्द करण्यात आला.

तर, काल 8 नोव्हेंबरला हे शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटण्यासाठी जाणार असल्याचं सांगण्यात आलं, मात्र, 8 नोव्हेंबरला देखील हे शिष्टमंडळ संभाजीनगरात पोहोचल नाही. दरम्यान आज, पुन्हा सरकारचं शिष्टमंडळ भेटण्यासाठी येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न

मोदी सरकारचा एक निर्णय, 2 पालखी मार्गांसाठी मिळाले 12 हजार 41 कोटी! 365 किमी मार्गांमुळे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन सुलभ; पालखी मार्गांची वैशिष्ट्ये काय? वाचा...

SCROLL FOR NEXT