devendra fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : ''मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही'' ओबीसींच्या आंदोलनात फडणवीस बोलले

संतोष कानडे

नागपूरः मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी जालन्यातल्या अंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचं आश्वासन देऊन सतराव्या दिवशी हे उपोषण सोडलं. जरांगेंनी सरसकट आरक्षणाची केलेली मागणी पूर्ण होऊ शकत नसल्याचं फडणवीसांनी शनिवारी स्पष्ट केलं.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंबंधीचा जीआर राज्य शासनाने काढलेला आहे. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणामध्ये वाटेकरी वाढत असल्याचा धोका निर्माण होतोय, शिवाय सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मराठा आंदोलकांची मागणी आहे. त्यामुळे राज्यभरात ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलनं सुरु आहेत.

छत्रपती संभाजी नगर येथे सुरु असलेल्या आंदोलनाला देवेंद्र फडणवीसांनी भेट दिली. त्यानंतर त्यांना नागपूर येथे सुरु असलेल्या आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ओबीसी समाजाच्या वाट्याचं आरक्षण दुसऱ्या समाजाला मिळणार नाही, असा शब्द दिला.

देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, आम्ही ओबीसी आरक्षणामध्ये वाटेकरी होऊ देणार नाहीत. मराठा आरक्षणासाठी क्युरेटिव पिटीशन दाखल करण्यात येणार असून पुन्हा स्वतंत्रपणे आरक्षण देण्यासंबंधी पावलं उचलण्यात येणार आहेत. आता जो आरक्षणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो पूर्वीच्या कुणबी असलेल्यांसाठी आहे.

फडणवीस पुढे म्हणाले की, मराठा समाजामध्ये जे पूर्वी कुणबी होते त्यांना नवीन जीआरनुसार प्रमाणपत्र मिळेल. परंतु सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, ते शक्यही नाही. जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळासोबतही यासंदर्भात चर्चा झालेली आहे. कारण सरसकट प्रमाणपत्र देण्याचा निर्णय कोर्टामध्ये टिकणार नाही.

''आरक्षणाच्या प्रश्नावरुन मराठा विरुद्ध ओबीसी आणि कुणबी असा संघर्ष होणार नाही. ओबीसींच्या वाट्याचं आरक्षण दुसऱ्या समाजाला मिळणार नाही'' असा शब्द यावेळी देवेंद्र फडणवीसांनी आंदोलकांना दिला. त्यामुळे जरांगे पाटलांच्या सरसकट आरक्षणाच्या मागणीचं काय होणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT