Loksabha Election 2024
Loksabha Election 2024

Loksabha Election 2024: राष्ट्रवादीला पुन्हा वंचितची भीती? सुजात आंबेडकरांचे रोहित पवारांना ४ खोचक प्रश्न

Loksabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीने इंडिया आघाडीविरोधात उमेदवार देऊ नये, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांना केले होते. वंचित इंडिया आघाडीचा भाग नाही. प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत मागणी देखील केली होती. मात्र याबाबत अजून अस्पष्ठता आहे. दरम्यान रोहित पवारांच्या आवाहानावर सुजात आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुजात आंबेडकर म्हणाले, मुळात आज रोहित पवार यांना काय हवे आहे की VBA ची निवडणूकीचा भाग होऊ नये. राष्ट्राच्या वंचितांनी आणि बहुजनांनी नेहमीच प्रबळ जातींसाठी बलिदान दिले पाहिजे का  जसे तुम्ही शतकानुशतके करत आला आहात? रोहित दादा पवार यांना माझे २ प्रश्न आहेत. जर इंडिया आघाडीने आमंत्रित केले नाही तर आम्ही निवडणूक लढवायची नाही का?

तसेच मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वंचितसारख्या धोरणाचे अनुसरण का करु नये, असा प्रश्न सुजात आंबेडकर यांनी विचारला आहे.

सुजात आंबेडकरांचे ४ प्रश्न-

सुजात आंबेडकर म्हणाले, भलेही इंडिया आघाडीच्या निर्णय प्रक्रियेत तुम्ही सहभागी नसाल पण, इंडिया आघाडीच्या महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीला घेण्याबद्दल एक वाक्यता का नाही?

वंचितने इंडियाविरोधात उमेदवार उभा करू नये ही भूमिका घेताना इंडिया आघाडीच्या नेत्यांनी स्वतः वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देऊन मतांची फूट टाळण्याचा प्रयत्न का करू नये?

'फोडा आणि राज्य करा' ही भाजपची निती स्पष्ट असताना वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीतून दूर ठेवून फूट का पाडली जात आहे?

सर्वांनी दोन पाऊल मागे घेण्याची गरज असेल, तर जे आधीच मागे आहेत त्यांनी आणखी किती पाऊले मागे जायचं? (Latest Marathi News)

Loksabha Election 2024
Project Cheetah 2: आता दुसरा टप्पा! भारतात पुन्हा परदेशातून येणार चित्ते, सरकारी अधिकाऱ्यांची माहिती

राष्ट्रवादीला वंचितची भीती का?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार पराभूत झाले होते. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी अनेक मते खाल्ली होती. वंचित आघाडीमुळे राज्यातल्या सात-आठ मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेसला फटका बसला आहे. यामुळे सरळ भाजप आणि शिवसेनेला फायदा झाला होता. त्यामुळे पुन्हा २०२४ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला वंचितची भीती वाटते का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. 

Loksabha Election 2024
दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत पाकिस्तानचा अडथळा; मृतदेह ताब्यात घेत असताना भारतीय लष्करावर गोळीबार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com