महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : बीडमध्ये २० गुन्हे अन् सहा हजारांपेक्षा जास्त आरोपी; 95 जणांना पोलिसांनी केली अटक

सकाळ वृत्तसेवा

बीड : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंब्यासाठी जिल्ह्यात सुरू झालेल्या आंदोलनाला शनिवारपासून (ता. २८) हिंसक वळण लागले. सोमवारी (ता. ३०) नेत्यांची घरे, कार्यालये तसेच इतर प्रतिष्ठानांना आग लावणे, दगडफेक केल्याप्रकरणी १५ गुन्हे नोंद झाले आहेत. गेल्या आठवड्यातील अशाच घटनांप्रकरणी पाच गुन्हे नोंद झाले आहेत.

या गुन्ह्यांत आतापर्यंत १२५ संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. यातील ९५ जणांना अटक झाली आहे. दाखल गुन्ह्यांतील अज्ञात संशयितांची संख्या सहा ते सात हजार आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात दोन रात्र व एक दिवसाची संचारबंदी लागू होती.

ती बुधवारी शिथिल करून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर गेल्या सोमवारी रात्री संचारबंदी लागू करून पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरु केली.

त्यानंतर मंगळवारी (ता. ३१) अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, राज्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण पुण्याचे पोलिस अधिकारी दोन दिवसांपासून ते बीडमध्ये तळ ठोकून आहेत. जाळपोळ व दगडफेकीचे प्रकार घडलेल्या नेत्यांच्या घरांसह जिल्ह्यातील आमदार व अन्य नेत्यांच्या घरांना सध्या पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Cleanliness: 'मुंबईला स्वच्छ शहराचा किताब का मिळू नये?' उच्च न्यायालयाचे महापालिकेला फटकारे, इंदूरचा आदर्श घेण्याचे निर्देश

Shirala Mini Konkan Monsoon Tourism : लोणावळा-महाबळेश्वर विसरा! शिराळ्याचं 'मिनी कोकण' धुक्यात न्हालं; विकेंडला पर्यटकांची तुफान गर्दी, कास पठारसारखं खुललं सौंदर्य

Latest Marathi News Live Update : एसटी भाडेवाढीचा निर्णय लांबणीवर; ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

Climate Change & Sleep: हवामान बदलाचा झोपवर परिणाम! भारत ठरतोय हॉटस्पॉट; शारीरिक, मानसिक आरोग्याला मोठा धोका

Income Tax 2026: TDS, TCS आणि Advance Tax म्हणजे नेमकं काय? फरक समजून घ्या नाहीतर भरावा लागू शकतो मोठा दंड

SCROLL FOR NEXT