Maratha Reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : पहिलं कुणबी प्रमाणपत्र लाभार्थ्याने जाळून टाकलं; ''माझे भाऊ उपाशी अन् मी...''

संतोष कानडे

धाराशिवः राज्यामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलेलं आहे. त्यामुळे शासन स्तरावरुन मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ज्यांचे पुरावे सापडले आहेत, त्यांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासंबंधीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

मंगळवारी राज्य शासनाने कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात निर्णय घेतल्यानंतर बुधवारी धाराशिव जिल्ह्यातील एका मराठा बांधवाला कुणबी प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांनी सुपूर्द केलं होतं. परंतु सायंकाळी लाभार्थ्यानेच ते प्रमाणपत्र जाळून टाकलं आणि राज्य शासनाचा निषेध केला.

धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी धाराशिवमधील सुमित माने यांना पहिलं कुणबी प्रमाणपत्र सुपूर्द केलं होतं. सुमित यांनी प्रमाणपत्र स्वीकारताना म्हटलं होतं की, सरकारने मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र द्यावे, नसता मी हे परत करणार आहे.

बुधवारी सायंकाळी सुमित माने यांनी मराठा आंदोलकांसह मिळालेलं कुणबी प्रमाणपत्र जाळून टाकलं. ते म्हणाले की, मला एकट्याला प्रमाणपत्र देऊन चालणार नाही. माझे बांधव आहेत त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं. एकट्याला जेवायला द्यायचं आणि बाकीच्यांना उपाशी ठेवायचं, आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न असेल तर आम्ही त्याची होळी करु. सकाळी माझी दिशाभूल झाली होती, असं माने यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेले मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी रात्रीपासून पाणी त्यागण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारमधील मंत्र्यांनी आंतरवालीमध्ये येऊन पुढची दिशा स्पष्ट करावी आणि आरक्षणाबाबत काय करणार ते सांगावं, असं आवाहन जरांगेंनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत नोटिसीला केंद्र सरकारचं उत्तर; हायकोर्टानं याचिका काढली निकाली

Nagothane Flyover Cracks : उड्डाणपुलावर 60 दिवसांत चार ते सहा इंच रुंदीच्या 50 मीटर लांबीच्या भेगा, वाहतूक केली बंद

Viral Video : भाजप नेत्याचा भर रस्त्यात फोनवर बोलता बोलता मृत्यू; हार्ट अटॅक येताच खाली कोसळले अन्... CCTV मध्ये कैद थरारक घटना

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवारांना आम्ही सर्व गोष्टी सांगतो, अजितदादांसारखं ट्यूनिंग वहिनींसोबतही आहे - सुनील तटकरे

Pune News: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय! वनजमिनीवरील पिकांची स्वतंत्र नोंद; वनहक्कधारकांना मिळणार सुधारित सातबारा

SCROLL FOR NEXT