Maratha Reservation 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: "७५ वर्षात मराठा आरक्षणासाठी कुणी काय केलं हे..."; मनोज जरांगे यांचा इशारा

Sandip Kapde

Maratha Reservation: मराठा आरक्षणामुळे चर्चेत असणारे मनोज जरांगे साखळी उपोषणाच्या माध्यमातून उद्यापासून (बुधवार) राज्यभर दौरे करत आहेत. मनोज जरांगे यांनी सरकारला २४ डिसेंबर मराठा आरक्षणासंदर्भात वेळ दिला आहे. मराठा समाजाने आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा डाव मोडून काढला असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. सर्व जिल्ह्यात नोंदी सापडत आहे. ३५ ते ४० टक्के लोकांना प्रमाणपत्र मिळालं आहे. त्यामुळे समाधान असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

आरक्षणासाठी कुणी काय केलं, हे आपण २४ डिसेंबरनंतर समाजासमोर मांडणार असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.  सकल मराठा समाजाची मुंबईत एक बैठक झाली. या बैठकीत मनोज जरांगे यांची नेता म्हणून मराठा समाजाने निवड केली आहे.

समाजाचे सेवक म्हणून समाजाची सेवा करणार, सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार, ५० टक्क्याच्या आत लोकसंख्येनुसार आरक्षण मिळणार.

१९९४ ला शरद पवार यांनी ओबीस आरक्षण दिले होते. त्यांचे मित्र नरेंद्र मोदी यांना आता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असा मुद्दा देखील मुंबईतील मराठा समाजाच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. यावर मनोज जरांगे म्हणाले, ७५ वर्षात आरक्षणासाठी कुणी काय केलं हे मी २४ डिसेंबरनंतर समाजासमोर मांडणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT