Narendra Modi 
महाराष्ट्र बातम्या

मॅग्नेटिक महाराष्ट्र-कन्व्हर्जन्सचे मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र-कन्व्हर्जन्स 2018 या जागतिक गुंतवणूक परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (रविवारी) उद्‌घाटन होणार आहे. सुमारे दहा लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवलेली ही परिषद "एमएमआरडीए'च्या प्रांगणात होणार असून, यामध्ये तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची परिषद आयोजित करण्यात येत आहे. यापूर्वी मेक इन इंडिया या परिषदेचे यजमानपद राज्याने स्वीकारले होते. सन 2016 मध्ये आयोजित या परिषदेत आठ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले होते, त्यापैकी सुमारे 61 टक्के करारांवर प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेतून 10 लक्ष कोटी रुपयांच्या उद्योगांच्या आश्वासनांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे; तर सुमारे साडेचारशे हजार सामजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याचे नियोजित आहे. यातून 35 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. 

मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्‍स येथील एमएमआरडीए ग्राउंड येथे 18 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित या परिषदेचे उद्‌घाटन 18 फेब्रुवारीला सायंकाळी 5.45 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे; तर प्रदर्शनाचे उद्‌घाटन 7.15 मिनिटांनी होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर उपस्थित असतील. याचदिवशी मोठ्या कंपन्यांच्या निवडक सीईओंबरोबर मोदी चर्चा करणार आहेत. सायंकाळी 7.45 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. 

19 फेब्रुवारीला सकाळी दहा वाजल्यापासून विविध चर्चासत्रांना सुरवात होईल. यात प्रामुख्याने भविष्यातील उद्योग, रोजगार आणि पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा होणार आहे. यात नवे तंत्रज्ञान, स्मार्ट सिटीज्‌, निर्यात, सप्लाय चेनसह जर्नी टू ट्रिलीयन डॉलर इकॉनॉमी हा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष परिसंवाद होणार आहे. सायंकाळी स्टार्टअप पुरस्कार आणि उद्योगरत्न पुरस्कार रजनी होणार आहे. 
20 फेब्रुवारीला सकाळी दहा वाजल्यापासून तीन हॉलमध्ये एकाच वेळी वेगवेगळ्या विषयांवरील चर्चासत्रे होणार आहेत. यात जलसंधारण, महिला उद्योगधोरण, इज आफ डुइंग बिजनेस, मुंबई फायनान्शियल हब, मेक इन महाराष्ट्र 2.0 यांचा समावेश आहे. सायंकाळी 4.30 वाजता परिषदेचा सांगता समारंभ होणार आहे. हे प्रदर्शन दि.23 फेब्रुवारीपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. 

महाउद्योगरत्न पुरस्कार रजनी 
राज्यातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनातर्फे उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजकांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र-कन्व्हर्जन्स 2018 या परिषदेत दुसऱ्या दिवशी 19 फेब्रुवारीला एका विशेष कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. माहिती तंत्रज्ञान, निर्यात यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील 47 मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासोबतच राज्यातल्या नवोदित व तरुण व्यावसायिकांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीने आयोजित मॅग्नेटिक महाराष्ट्र स्टार्टअप अंडर 30 या स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT