Online Admission Sakal media
महाराष्ट्र बातम्या

वैद्यकीय पदव्युत्तरची प्रवेश प्रक्रिया १३ जानेवारीपासून सुरू

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १३ ते १७ जानेवारी दरम्यान ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया करता येणार आहे.

मीनाक्षी गुरव

पुणे : आरोग्य विज्ञान पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १३ ते १७ जानेवारी दरम्यान ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया (Online Registration Process) करता येणार आहे. या अंतर्गत एमडी, एमएस आणि पदविका अभ्यासक्रमासाठी (MD, MS, Diploma Syllabus) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. (Medical Admission Precess Updates)

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशाबाबतची नियमावली पुस्तिका सीईटी सेलच्या ‘www.mahacet.org’ संकेतस्थळावर ‘नीट-पीजीएम’ येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. राज्य कोट्यांतर्गत सरकारी, निमसरकारी, अनुदानित, विनाअनुदानित खासगी, अल्पसंख्याक वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती मिळावी, म्हणून अधिकृत संकेतस्थळावर माहितीपुस्तिका प्रसिद्ध केली आहे, अशी माहिती ‘सीईटी सेल’ने दिली आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक: तपशील : कालावधी

  • - ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया (नीट पीजी २०२१) : १३ ते १७ जानेवारी

  • - ऑनलाइन नोंदणी शुल्क भरणे : १३ ते १७ जानेवारी

  • - प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे संबंधित संकेतस्थळावर अपलोड करणे : १३ ते १७ जानेवारी

  • - नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण यादी जाहीर करणे (नीट-पीजी २०२१) : १८ जानेवारी

  • - तात्पुरती राज्य गुणवत्ता यादी जाहीर करणे : २१ जानेवारी

  • - प्रवेशासाठी उपलब्ध जागांचा तपशील जाहीर करणे : २१ जानेवारी

  • - ऑनलाइन पद्धतीने प्राधान्यक्रम, पसंतीक्रम निवडणे : २२ ते २७ जानेवारी

  • - पहिली निवड यादी जाहीर करणे : २८ जानेवारी

  • - प्रत्यक्ष जाऊन प्रवेश निश्चितीचा अर्ज भरणे आणि प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करणे : २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Alert: 60 किलोमीटरच्या वेगाने दिल्लीच्या दिशेने येतेय वादळ! 'नोएडा'सह लगतची शहरं अंधारात

Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोठी भेट! मुंबईतून पुन्हा धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; बुकिंग कधीपासून? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Nepal Floods: हिमालय धोक्यात? नेपाळच्या महापुराने वाढवली भारताची चिंता! नेमकं काय घडतंय?

Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? पाहा RBI काय सांगते

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

SCROLL FOR NEXT