रुग्णांना दवाखान्यात दाखल करताय? जाणून घ्या केंद्राच्या सूचना | Guidelines | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patients

रुग्णांना दवाखान्यात दाखल करताय? जाणून घ्या केंद्राच्या सूचना

पुणे : दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या (Corona Patient) वाढत असल्याने केंद्र सरकारने (Central Government) रुग्णांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार सौम्य लक्षणे असलेल्यांना उपचारासाठी दाखल न करता, त्यांच्यावर गृहविलगीकरणातच उपचार केले जाणार आहेत. (New Rule For Corona Patient)

परंतु सौम्य लक्षणे आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांना आता गरजेनुसार तेही सात दिवसच उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. शिवाय अशा रुग्णांना घरी सोडण्यापूर्वी पुन्हा कोरोनाची चाचणी करू नये, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना केली आहे.

कोरोना रुग्णांचे उपचार, गृहविलगीकरण आणि गृहविलगीकरणात रुग्णांनी काय काळजी घ्यावी, याबाबतचे सुधारित धोरण केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी निश्‍चित केले आहे. या या नव्या धोरणानुसार कोरोना रुग्णांचे चार संवर्गात रुग्णांचे वर्गीकरण केले आहे. या वर्गीकरणानुसार सौम्य लक्षणे असलेला सर्वसाधारण रुग्ण, सौम्य लक्षणे असलेला व अन्य व्याधीने ग्रस्त असलेला रुग्ण, मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेले आणि गंभीर लक्षणे असलेले रुग्ण असे चार प्रकार केले आहेत.

यापैकी पहिल्या प्रकारातील म्हणजेच कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरच्या घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार केले जाणार आहेत. सौम्य लक्षणे व सहव्याधी असलेल्या कोरोना रुग्णांना सरसकट रुग्णालयांत दाखल करू नये. त्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचाराची गरज असलेल्यांना उपचारासाठी थेट रुग्णालयात दाखल न करता त्यांना पहिल्यांदा कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल करावे, आणि या रुग्णांना सलग तीन दिवस ताप आला नाही किंवा या रुग्णांची आॅक्सीजन पातळी सलग तीन दिवस ९३ टक्क्यांहून अधिक असणाऱ्या कोरोना रुग्णांना सात दिवसात घरी सोडावे आणि या रुग्णांना घरी सोडण्यापूर्वी त्यांची पुन्हा कोरोना चाचणी घेऊ नये, अशी सूचना केंद्रीय आरोग्य खात्याने केली आहे.

मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांनासुद्धा सरसकट दाखल न गरजेनुसारच उपचारासाठी दाखल करावे. या रुग्णांना थेट रुग्णालयात दाखल न करता, त्यांना प्रथम डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल करावे. या रुग्णांना दाखल कालावधीत सलग तीन दिवस ताप न आल्यास आणि त्यांची आॅक्सीजन पातळी सलग तीन दिवस ९३ टक्क्यांहून अधिक या प्रमाणात स्थिर राहिल्यास,अशा रुग्णांनाही सात दिवसात घरी सोडण्यात येणार आहे.

हेही वाचा: कात्रज घाटात बस पलटी

यापुढे केवळ कोरोनाचे गंभीर रुग्ण आणि सहव्याधी असलेले गंभीर रुग्ण यांनाच उपचारासाठी थेट रुग्णालयात दाखल करून घेतले जाणार आहे. अन्य सर्व रुग्णांना घरच्या घरी, कोवीड केअर सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्येच उपचार घ्यावे लागणार असल्याचे केंद्र सरकारच्या या सुधारित मार्गदर्शक सूचनांवरुन स्पष्ट झाले आहे.

गृहविलगीकरणातील रुग्णांनी काय करावे?

  • कुटुंबातील अन्य सर्व व्यक्तींपासून दूर राहावे

  • घरात रुग्णांसाठी स्वतंत्र खोली, शौचालय आणि स्नानगृह असावे

  • गृहविलगीकरणाच्या खोलीत पुरेशी खेळती हवा असावी

  • घरात सातत्याने तीन पदरी मुखपट्टी (मास्क) वापरावा

  • पुरेशी विश्रांती आणि मोठ्या प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करावे

  • सातत्याने हात स्वच्छ धुवावेत किंवा सॅनियायझरचा वापर करावा

  • रुग्णाने स्वतःच्या वस्तू, भांड्यासह अन्य व्यक्तींना शेअर करू नयेत

  • पल्स आॅक्सीमिटरच्या साहाय्याने स्वतःच स्वतःची आॅक्सीजन पातळी व पल्स रेट तपासून घ्यावा

  • रोज ताप मोजावा

  • घरातही एकमेकांच्या समोरासमोर एकमेकांच्या संपर्कात येऊ नये

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top