mla salary in maharashtra uddhav Thackeray leader share mla salary sleep check details  
महाराष्ट्र बातम्या

MLA Salary : 'इतका' पगार मिळतो, तरी गरीब म्हणावतात; ठाकरे गटाच्या नेत्याने आमदारांची 'सॅलरी स्लीप'च केली शेअर

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील जनतेने निवडणून दिलेल्या आमदारांना सरकारकडून किती वेतन मिळते याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात कायम कुतूहल असतं. हा बऱ्याचादा राजकीय चर्चेचा विषय देखील असतो.

यादरम्यान उद्धव ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने महाराष्ट्रातील आमदारांना नेमका पगार मिळतो तरी किती याची सविस्तर माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी ३२ लाखांचं वार्षिक पगार घेणारे आमदार स्वतःला गरीब म्हणवतात असा टोलाही यावेळी लगावला आहे.

अकोला जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाचे नेते अ‍ॅड.जयेश वाणी यांनी याबद्दलची माहिती ट्विटरच्या माध्यामातून शेअर केली आहे. यावेळी त्यांनी आमदारांना मिळणाऱ्या पगाराचं सगळं गणीत मांडून दाखवलं आहे.

३२ लाख रुपयांचं वार्षिक , ५ वर्षांसाठी १,६३,१६, ८२०/- रुपये इतकी रक्कम पगार म्हणून मिळणारे आमदार स्वतःला गरीब म्हणवतात असे वाणी म्हणाले आहेत. तसेच यातला सगळ्यात इंट्रेस्टींग पार्ट म्हणजे मोबाईल महिन्याला ९९९ रुपयांमधे आणि लँडलाईन साठी ३३० रुपयांमधे अनलिमीटेड कॅालींग मिळत असतांना आमदारांना १०,०००/- दिले जातात असेही त्यांनी निदर्शनात आणून दिलं आहे.

महत्वाचे म्हणजे वाणी यांनी या ट्वीट सोबत महाराष्ट्र विधानमंडळाकडून माहितीच्या अधिकाराअंतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीचं पत्र देखील जोडल आहे. ज्यामध्ये आमदारांना मिळणारं वेतन आणि भत्ते यांच्याबद्दलची माहिती दिली आहे. यामध्ये आमदारांना मिळणार मूळ वेतन, महागाई भत्ता, दूरध्वनी सुविधा भत्ता, स्टेशनरी टपाल सुविधा भत्ता आणि संगणक चालक सुविधा मिळण्यासाठीचा भत्ता अशा वेगवेगळ्या भत्त्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : मुंबईत मोठी दुर्घटना! ११व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, १२ गाड्यांचं मोठं नुकसान, एक जण जखमी...

Pune Birth-Death Records: जन्म-मृत्यू दाखल्यांतील दुरुस्तीला उच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; पुणे महापालिकेला अधिकार, प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आदेश

Akkalkot Hannur coordination meet: हन्नूरमध्ये ‘सहविचार सभा’द्वारे चपळगाव गटातील १८ गावांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा; प्रशासन-लोकप्रतिनिधींचा अभिनव समन्वय

Pune News : जन्म-मृत्यू दाखल्यांतील दुरुस्ती त्वरित सुरू करा; उच्च न्यायालयाचे आदेश

Raigad River Biodiversity: अंबा नदीत दुर्मिळ अल्बिनो एलीगेटर गार माशांचा सुळसुळाट; थेट बाजारात विक्री, जैवविविधतेला धोका

SCROLL FOR NEXT