Monsoon Sakal
महाराष्ट्र बातम्या

मॉन्सूनची प्रगती रोडावली; राज्याचा ३० टक्के भाग व्यापला

नामदेव कुंभार

पुणे - केराळात पोचल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात मॉन्सूनने महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पाय ठेवला होता. मात्र आता त्याची प्रगती काहीशी थंडावल्याचे दिसत आहे. शनिवारी (ता.५) दक्षिण कोकण, सोलापूरपर्यंत मजल मारणारा मॉन्सून रविवारी फक्त अलिबाग, पुणे आणि करमाळ्यापर्यंतचा प्रवास पूर्ण करू शकला. गंमत म्हणजे मॉन्सूनचे वारे दाखल झाले मात्र पाऊस पडत नसल्याचे चित्रही दिसत आहे.

उत्तर महाराष्ट्र ते केरळ किणारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाची पट्टा तयार झाला आहे. तसेच, कोकण गोव्यावर चक्रीय चक्रवात तयार झाल्याचे हवामान खात्याने कळविले आहे. मॉन्सून जरी दाखल झाला, तरी पुढील तीन चार दिवस त्या क्षेत्रात तुलनेने कमी पाऊस पडेल असे हवामान खात्याने म्हटले आहे. रविवारी उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मॉन्सूनपूर्वच पावसाने हजेरी लावल्याचे चित्र पहायला मिळाले.

मॉन्सूनची हवा -

- रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा,कोल्हापूर, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद आणि दक्षिण रायगड जिल्ह्यांत मॉन्सून दाखल

- रविवार पर्यंत राज्यातील ३० टक्के भाग मान्सूनने व्यापला

- उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मॉन्सूनपूर्व पाऊस पडला

- पुढील काही दिवस मॉन्सूनची प्रगती रोडावण्याची शक्यता

- मॉन्सून दाखल झाला तरी तुलनेने पाऊस कमी दिसतोय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: सोशल मीडियावरील TRP ला तुमचे यश समजण्याची चूक करू नका; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा कुणाला सल्ला?

Radhanagari Dam Water Level : गगनबावड्यासह 12 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी; राधानगरी धरणात 85 टक्के पाणीसाठा, कोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली

Latest Marathi Update : राहुल गांधींची मोदींवर टीका; 'शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली, धर्मेंद्र प्रधानांना हटवा'

PM Narendra Modi On Paper Leak : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! पेपरफुटीच्या प्रकरणांची फास्ट ट्रॅक कोर्टात होणार सुनावणी

Ujani Dam: उजनी धरणातील आवक १२,७९७ क्युसेकवर; उपयुक्त पाणीसाठा ५४ टक्के, धरणातून ५,५७० क्युसेक विसर्ग कायम

SCROLL FOR NEXT