HIV+ महिलेच्या शरिरात 216 दिवस कोरोना; 32 वेळा झाला म्युटेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

HIV+ महिलेच्या शरिरात 216 दिवस कोरोना; 32 वेळा झाला म्युटेट

HIV+ महिलेच्या शरिरात 216 दिवस कोरोना; 32 वेळा झाला म्युटेट

एचआयव्ही पॉझिटिव्ह महिला जवळपास सहा ते सात महिने कोरोना पॉझिटिव्ह होती. या कालावधीत कोरोना विषाणूनं 32 वेळा आपलं रुप बदलल्याचं (म्युटेट) एका अभ्यासात उघड झालं आहे. ही धक्कादायक घटना दक्षिण आफ्रिकामध्ये उघड झाली आहे. डरबन येथील क्वाजूलू-नेटल विद्यापीठातील संशोधकांनी या प्रकरणाचा खुलासा केला आहे.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, 36 वर्षीय महिलेच्या शरिरात 13 म्यूटेशन (जेनेटिक उत्परिवर्तन) स्पाइक प्रोटीन दिसून आले. हे प्रोटीन कोरोना विषाणूच्या प्रतिरोधक तंत्राच्या हल्ल्यापासून वाचवतात. या महिलेपासून इतरांना कोरोना विषाणूची लागण झाली की नाही? याबाबत अद्याप कोणताही माहिती मिळाली नाही. रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यास कोरोना विषाणू जास्त प्रभावी होतो. ज्याची रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत आहे, अशा लोकांना जास्त त्रास होत असल्याचेही अभ्यासात उघड झालं आहे. ज्या व्यक्तीला आधिच गंभीर आजार असतील तर कोरोना विषाणू जास्त प्रभावी होतो.

हिंदूस्थान टाईम्सनं अमेरिकेतील न्यूज एजन्सीच्या हवाल्यान दिलेल्या माहितीनुसार, एचआयव्ही संक्रमितांच्या प्रतिरोधक तंत्र समजून घेण्यासाठी सर्वेक्षण घेण्यात आलं होतं. 300 एचआयव्ही संक्रमित महिलांची यासाठी निवड करण्यात आली. यावेळी अभ्यासात 36 वर्षीय महिलेचा शरिरात कोरोना सहा महिन्यापर्यंत होता, हे उघड झालं. या महिलेच्या शरिरात कोरोना विषाणूनं अनेकदा आपलं रुपही बदल्याचं उघड झालं. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर या महिलेला थोडीफार लक्षणं होती. या संशोधनामध्ये चार एचआयव्ही संक्रमीत मिळाले, ज्यांच्या शरिरात एक महिन्यापेक्षा जास्त काळ कोरोना होता.

संशोधकानं केलेल्या दाव्यानुसार, हे संशोधन कोरोना महामारी रोखण्यासाठी फायद्याचं ठरु शकते. एचआयव्ही प्रभावित देशांमध्ये असा रुग्णांमध्ये कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी हे संशोधन फायद्याचं ठरेल. आफ्रिकेतील देशांमध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव आधिक वेगानं होत आहे.

टॅग्स :covid-19