Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena : 'मातोश्री'वर महिन्याला 100 कोटी जायचे; शिंदे गटाच्या खासदाराचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

शिंदे गटातील खासदारानं उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिंदे गटातील खासदारानं उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे.

बुलढाणा : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह अनेक आमदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. मात्र, हे सर्व एवढ्यावरच थांबलं नाही, तर शिवसेनेला (Shiv Sena) अजूनही एकावर एक झटके बसताना दिसत आहेत. त्यातच आता शिंदे गटातील नेते उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) थेट टीका करायला लागले आहेत.

आता शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. मातोश्रीवर प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपये नेले जात होते. सचिन वाझे हेच मातोश्रीवर हे खोके घेऊन जात होते, असा खळबळजनक दावा प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

जाधव यांच्या या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. राज्यात नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती केल्यानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून आले होते. यावेळी मेहकरमध्ये गुलाबराव पाटलांच रॅली काढून जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर हिंदू गर्वगर्जना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमातून शिंदे गटात गेलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट मातोश्रीवरच गंभीर आरोप केलेत.

दरम्यान, 50 खोके एकदम ओके म्हणताना शंभर खोके मातोश्री ओके तेही दर महिन्याला जात असतं, असं म्हणत जाधव यांनी उद्धव ठाकरेंवरच गंभीर स्वरूपाचा आरोप केलाय. मातोश्रीला दर महिन्याला शंभर खोके जात असल्याचा खळबळजनक दावा, प्रतापराव जाधव यांनी करून एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या आरोपानंतर ठाकरे गटातील शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT